‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या लोकप्रिय मालिकेने २३ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं होतं. त्यामुळे मालिका ऑफ एअर होणार हे कळताच अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मालिका बंद होऊन ६ ते ७ दिवस उलटून गेली असली तरीही मालिकेची क्रेझ अजूनही कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर काही तासांपूर्वी काही व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट केली आहे. ज्यामधून सिद्ध झालं आहे की, या मालिकेची क्रेझ फक्त मोठ्यांमध्ये नाही तर चिमुकल्यांमध्येही आहे. या विविध व्हिडीओमध्ये लहान मुलांचं ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेवर किती प्रेम होतं हे पाहायला मिळत आहे. या सगळ्या चिमुकल्याला चाहत्यांचे पल्लवीने या पोस्टद्वारे आभार मानले आहेत.

हेही वाचा – वॉटर स्पोर्ट्स आणि बरंच काही…, लग्नानंतर गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकरचं कोकण दर्शन

दरम्यान, अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली होती. रमाचा संसार सांभाळणारी आनंदी अल्पावधीत घराघरात पोहोचली. रमा-राघवच्या संसारात आलेला हा नवा गडी म्हणजेच आनंदीचं काही काळाने नवं राज्य पाहायला मिळालं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि अधिराज्य करू लागली होती.

हेही वाचा – सविता मालपेकरांना ‘काकस्पर्श’ चित्रपटात न घेण्याचा अनेकांनी महेश मांजरेकरांना दिलेला सल्ला, अभिनेत्री खुलासा करत म्हणाल्या…

पण कालांतराने मालिकेची मूळ वेळ बदलण्यात आली. तरीही मालिकेला प्रतिसाद चांगला मिळत होता. मात्र त्यानंतर मालिकेच्या वेळा सतत बदलण्यात आल्या. अखेर मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होऊ लागली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nava gadi nava rajya fame pallavi patil shara little fans video pps