मागील पाच महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील कोणती ना कोणती मालिका बंद होताना दिसत आहे. विषय चांगला असला तरी टीआरपीच्या कारणास्तव मालिका ऑफ एअर करण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात येत आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिका टीआरपीच्या कारणास्तव अवघ्या काही महिन्यातच बंद करण्यात आल्या. अजूनही हे मालिका बंद करण्याचा सत्र सुरुच आहे. ‘३६ गुणी जोडी’ जोडीनंतर आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील अनेक मालिकेच्या वेळा बदलण्यात येत आहेत. नवे शो, नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे जुन्या मालिकेच्या वेळेत बदल केला जात आहे. ४ डिसेंबरपासून हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ यांच्या वेळेत बदल करण्यात आला. ‘चला हवा येऊ द्या’ रात्री ८.३० वाजता, ‘नवा गडी नवं राज्य’ दुपारी २ वाजता आणि ‘३६ गुणी जोडी’ दुपारी २.३० वाजता प्रसारित करण्यात निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला. पण ‘३६ गुणी जोडी’ मालिकेच्या प्रेक्षकांनी वेळ बदलण्याचा निर्णयाचा तीव्र विरोध केला. त्यामुळे वाहिनीने निर्णय मागे घेऊन ‘३६ गुणी जोडी’ मालिका आधीच्या वेळेत म्हणजे रात्री ११ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

lakshami niwas
Video: गुंडांनी जान्हवीची छेड काढल्याचे पाहताच जयंतचा संताप अनावर; पाहा ‘लक्ष्मी निवास’मध्ये काय घडणार?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
tharla tar mag arjun and sayali haldi ceremony
ठरलं तर मग : ‘या’ दोन व्यक्तींमुळे सायलीला लागणार अर्जुनची उष्टी हळद! काय आहे नवीन प्लॅन? पाहा प्रोमो…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
Paaru
Video: गुंड प्रीतमला बेदम मारहाण करणार अन्…; किर्लोस्कर कुटुंबावर मोठे संकट; ‘पारू’ मालिकेत नेमके काय घडणार?
Premachi Goshta
Video : सई दूर गेल्याने मुक्ता संतापली, सागरच्या थेट कानशि‍लात लगावली; पाहा मालिकेचा नवा प्रोमो
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब

हेही वाचा – आमिर खानचा होणारा जावई आहे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा फिटनेस ट्रेनर

मात्र, ४ डिसेंबरपासून ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ८.३० आणि ‘नवा गडी नवं राज्य’ दुपारी २ वाजता प्रसारित होत आहे. पण आता अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेता कश्यप परुळेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. दोन दिवसांपूर्वी मालिकेचं शूटिंग संपलं असून डिसेंबर महिन्यातच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – “…नाहीतर बुक्कीत टेंगूळ”, ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधीची अमेय बर्वेसाठी खास पोस्ट, म्हणाली, “तुझं ज्ञान, तुझी बुद्धी…”

दरम्यान, ‘झी मराठी’वर लवकरच नवीन रिअ‍ॅलिटी शो भेटीस येणार आहे. ‘ड्रामा Juniors’ असं नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव आहे. आता हा शो कधीपासून सुरू होणार आणि ‘३६ गुणी जोडी’, ‘नवा गडी नवं राज्य’ कधी बंद होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Story img Loader