Navari Mile Hitlerla: सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा व्हॅलेंटाइन वीक १४ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. हा व्हॅलेंटाइन वीक एकप्रकारे प्रेमाचा सप्ताह असतो. या आठवड्यात विविध माध्यमातून प्रेम व्यक्त केलं जात. त्यामुळेचं आता मालिकांमध्येही प्रेमाचा बहर पसरला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे आणि लीलाच्या नात्याला आता एक वेगळं वळणं येणार आहे.

नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. प्रेमाचा महासप्ताह निमित्ताने एजे लीलाला हटके अंदाजाने प्रेमाची कबुली देताना पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये एजे आणि लीलाने वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी एजे लीलाला म्हणतो, “तू आज खूप सुंदर दिसतेय.” त्यानंतर दोघं रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. मग लीला एजेला विचारते, “आज तरी तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना?” तेव्हा एजे लीलाला हटके अंदाजात प्रपोज करताना पाहायला मिळत आहे. श्वान टायगरच्या मदतीने एजे लीलासमोर प्रेमाची कबुली देताना दिसत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा हा प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे. या प्रोमोचं कौतुक होतं असून यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, वाव खूप मस्त. हा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण प्लीज हे खरं असू द्या. स्वप्न किंवा त्या किशोर आणि त्या सूनांनी काही प्रोब्लेम करायला नको. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “जबरदस्त प्रोमो. हा रोमँटिक आणि गोड भाग पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, अखेर एजेने लीला प्रपोज केलं.

Story img Loader