लीला-एजेची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन मोठे मनोरंजन करताना दिसत आहे. ही दोन पात्रे प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून एजे लीलाच्या प्रेमात पडल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेतील लीला व एजेची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. आता एजे लीलासाठी डान्स करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
एजे लीलाला देणार स्पेशल सरप्राईज
नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये एजे लीलासाठी डान्स करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे त्याने त्याचा लूकही बदलला आहे. त्याने गुंडासारखी वेशभूषा केली आहे. त्याचे हे अनोखे रूप पाहून लीलाला आश्चर्य तर वाटले आहे मात्र त्याबरोबरच तीला आनंदही झाला आहे. याबरोबरच, दुर्गा लक्ष्मी सरस्वती या त्यांच्या सुनांनादेखील आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोममध्ये पाहायला मिळते की विराज एक घोषणा करतो, तो म्हणतो, “आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी स्पेशल आहे. खासकरून लीला हा कार्यक्रम तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुझ्यासाठी स्पेशल सरप्राइज प्लॅन केला आहे. तर तू तयार आहेस का? विराजने ही घोषणा केल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत आहे. त्यानंतर एजे ‘आपुन बोला तू मेरी लैला’, या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या या डान्समध्ये त्याची मुले व विश्वरूप साथ देताना दिसत आहेत. तर लीलाच्या आई व वडीलांनादेखील आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना, “लीलाला मिळणार एक स्पेशल सरप्राईज”, अशी कॅप्शन दिली आहे.
नवरी मिळे हिटलरला मालिकेतील हा डान्सचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत कौतुक केले आहे. एका नेटकऱ्यांनी म्हटले, “ही लीला काय सुधारणार नाही.स्वप्न खरं होतं तरी स्वप्नात जाते”, असे म्हणत हसणाऱ्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर पुढे एजे खूप डॅशिंग दिसत असल्याचे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “मी डान्स व हा एपिसोड पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.” तर अनेकांनी खूप छान, खूप सुंदर अशा कमेंट करत कौतुक केले आहे.
हेही वाचा:
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजेने घरी नवीन वर्षाची पार्टी ठेवली आहे. ही पार्टी लीलासाठी खास ठरावी याची त्याने काळजी घेतली आहे. घरातील सर्वजण यासाठी अत्यंत छान पोशाखात तयार झाले आहेत. मात्र, सुनांच्या कारस्थानामुळे लीला वेगळ्यात पोशाखात येते. तिचा तो अवतार पाहून सर्वजण तिच्यावर हसतात. तिला वाईटप्रकारे बोलले जाते. त्यानंतर लीला रडत रडत तिच्या खोलीत जाते. एजे तिला समजावतो व लूकमध्येसुद्धा ती क्यूट दिसत असल्याचे सांगतो.
दरम्यान, नवरी मिळे हिटलरला मालिकेत पुढे काय होणार, एजे त्याच्या भावना लीलासमोर मांडणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.