‘नवरी मिळे हिटलरला'( Navri Mile Hitlarla) या मालिकेत सध्या एजे व लीला यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एजे लीलाच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एजे व लीला आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खूश करताना दिसतात. अनेकदा या जोडप्यामध्ये भांडणे पाहायला मिळतात, त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुरबुरी चालू असल्याचे दिसते. मात्र, वेळोवेळी ते एकमेकांना मदत करतात. आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून, एजेचे वागणे सर्वांना चकित करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, एजे ऑफिसमधून लवकर घरी येतो. एजेला पाहताच लीला त्याला विचारते की, आज ऑफिसमधून लवकर कसे आलात? त्यावर एजे म्हणतो, “आज ऑफिसचं काम लवकर संपलं आणि वाटलं की तुला थोडा वेळ द्यावा”, हे ऐकताच तिथेच उभी असलेली लक्ष्मी एजेला म्हणते, “कोणी नियम मोडला, तर एजे त्यांना शिक्षा करायचे. पण आता आमच्याबरोबर भेदभाव होतो, असं तुम्हाला वाटत नाही का?”, तिचे हे बोलणे ऐकून आजी म्हणतात, “तुम्हाला असं वाटतं का की, लीलालासुद्धा शिक्षा व्हायला हवी.” त्यावर सरस्वती व लक्ष्मी होकार देतात. त्यानंतर एजे लीलाला शिक्षा देतो. तो म्हणतो, “तुला माझ्यासाठी मला आवडणारा पदार्थ बनवायचा आहे.” एजेने दिलेली शिक्षा ऐकल्यानंतर लीला खूश झाल्याचे दिसत आहे. एजेच्या चेहऱ्यावरदेखील हसू असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजे लीलाच्या प्रेमासाठी इतके बदलणार…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे एजे परफेक्ट आहे. त्याला कोणत्याही कामात होणाऱ्या चुका मान्य नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्तीकडून कोणतीही चूक होईल, त्याला एजे शिक्षा देतो. याआधी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांना अनेकदा शिक्षा झालेली आहे. त्याबरोबरच लीलालासुद्धा तिच्या वेंधळेपणासाठी, तिने केलेल्या चुकांसाठी एजेने तिला शिक्षा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. आता मात्र एजेच्या स्वभावात बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

आता एजेचे हे वागणे त्याच्या सुनांना आवडणार का, मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader