‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेत आता पुन्हा एकदा लीलाला एजेच्या रोषाचा सामना करावा लागणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात एजे व लीला यांच्यामध्ये पुन्हा एकदा चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजीने लीलाला संपू्र्ण घराची जबाबदारी दिली आहे. आता मात्र एजे व लीला यांच्यात पुन्हा एकदा दुरावा निर्माण होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजी बेशुद्ध पडणार…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आजींना चक्कर येत आहे. त्या लीला असे म्हणत जमिनीवर बेशुद्ध होऊन पडतात. घरात फक्त आजी व लीलाच असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. लीला तिच्या रूमध्ये काहीतरी पाठ करत असल्याचे दिसत आहेत. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या घरी येतात व आजींना हाक मारतात. मात्र आजी त्यांना उत्तर देत नाहीत. त्यामुळे दुर्गा लीलाला विचारते की आजी कुठे आहेत? लीला त्यांना म्हणते, “त्यांच्या रूममध्ये असतील. मग दुर्गा तिला विचारते, मग त्या कॉल का घेत नाहीयेत. त्यानंतर त्या सगळ्या आजींच्या रूममध्ये तर त्यांना आजी बेशुद्ध पडलेल्या दिसतात. त्यानंतर दुर्गा चिडून लीलाला म्हणते, “तुझ्यामुळे झालंय हे सगळं. दुपारच्या गोळ्या दिल्या होत्यास का त्यांना? प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एजेसुद्धा घरी आला आहे. लीला त्याच्याशी बोलायला जाते. पण तो निघून जातो.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “घडल्या प्रकारामुळे एजेदेखील लीलावर चिडतील का…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, ” थोडे चिडतील.पण, कदाचित नेहमी प्रमाणे नाही. दिलीच शिक्षा तरी थोडी मवाळ असेल. काही करा पण लीलाला घराबाहेर काढू नका. कारण आता या वेळी गेली तर तीला मावशीआई पण घरात घेणार नाही”, एका नेटकऱ्याने म्हटले, “काय सारखंच तिच्यावर आरोप करत असतात. एकदाच तिला घराबाहेर काढा.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “एजेच्या प्रेमात पडली. काही सुचत नाही ना, त्याला कारणीभूत एजेच.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सध्या एजेच्या सर्वात जवळ असणारी व्यक्ती म्हणजे त्याची आई आहे. तिच्या सांगण्यावरूनच एजेने दुसरे लग्न करण्याचे मान्य केले. लीलासुद्धा आजीच्या जवळची आहे. दोघी एकमेकींना मैत्रीणी मानतात. एकमेकांची मदत करतात. तसेच काळजीही घेतात.

हेही वाचा: “हा अपघात राजकीय प्रचारसभेत झाला असता…”, अल्लू अर्जुनच्या अटकेवर विवेक ओबेरॉयचं स्पष्ट मत; उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

आता नेमके कशामुळे आजी बेशुद्ध पडल्या, त्यामध्ये लीलाची काही चूक असणार का, एजे लीलाला माफ करणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.