‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेतील सरस्वती व लक्ष्मी ही पात्रे घराघरात पोहोचली आहेत. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या तिघी सतत लीलाला त्रास देण्यासाठी काही ना काही करताना दिसतात. लीला कधी कधी त्यांच्या बोलण्याला फसते. अनेकदा त्यांना सडेतोड उत्तरे देते. मालिकेतील त्यांचे नाते आंबट-गोड असले तरी पडद्यामागे मात्र हे कलाकार एकमेकांबरोबर मजा मस्ती करताना दिसतात. विविध व्हिडीओ व सोशल मीडियावरील विनोदी रील्स अशा माध्यमातून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. आता मालिकेतील लक्ष्मी व सरस्वती यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मी व सरस्वतीने शेअर केला व्हिडीओ

‘नवरी मिळे हिटलरला’या मालिकेतील लक्ष्मी व सरस्वती यांनी सोशल मीडियावर एक विनोदी रील शेअर केली आहे. आमचे पती आमच्यावर प्रेम करत नाहीत, असे या रीलचा आशय आहे.हा व्हिडीओ सरस्वतीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री भूमिजा पाटीलने शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअऱ करताना तिने, “सरस्वती आणि लक्ष्मीचा नेहमीचा विषय”, अशी कॅप्शन दिली आहे. याबरोबरच लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सानिका काशिकर व नवरी मिळे हिटलरच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे.

आता अभिनेत्रींच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र, या सगळ्यात नवरी मिळे हिटलरला मालिकेतील सहकलाकारांनीदेखील यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. रेवतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आलापीनीने कमेंट करीत लिहिले की लवकरच रेवती या गँगमध्ये येणार आहे. लक्ष्मीचा नवरा म्हणजे प्रमोदची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद नंदाने लिहिले की आत्ता आठवतोय आम्ही? लीलाचा रोमान्स बघून ईर्ष्या वाटत होती ना? द्या अजून त्रास द्या लीलाला”, तर सरस्वतीचा पतीची म्हणजेच विराजची भूमिका साकारणाऱ्या राजदीपने कमेंट करीत लिहिले की, बरं आपल्या लेखकाला मी ही रील पाठवली आहे.

दरम्यान, मालिकेत प्रमुख भूमिकेत वल्लरी विराज व राकेश बापट दिसत आहेत. त्यांची लीला-एजेची जोडी प्रेक्षकांचे मन जिंकून घेताना दिसते. मालिकेबरोबरच हे कलाकार सोशल मीडियावरील व्हिडीओमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. नवरी मिळे हिटलरला ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.