सोशल मीडियावरील रील हे मनोरंजनाचे एक साधन झाले आहे. विनोद, डान्स, मिमिक्री, रील, अशा अनेकविध प्रकारचे कंटेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत विविध माध्यमांतून अनेक जण लोकांचे मनोरंजन करत असतात. लोकांपर्यंत सहजपणे पोहोचण्याचे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे पडद्यावर दिसणारे कलाकारदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक लोकप्रिय कलाकार सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ, विनोदी रील्स, तसेच रोजच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे कलाकारांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या रील्ससुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यांना प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसते. आता ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेतील कलाकारांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, त्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील सरस्वती हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने भुमिजा पाटील हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सहकलाकार राजदीपबरोबर डान्स करताना दिसत आहे. ‘हैला हैला’ या गाण्यावर दोघांनी ठेका धरला असून, त्यांचा हा खास अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या गाण्यात दोघांनी लाल व पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दोघांनी या गाण्यात एकमेकांना साथ देत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने ‘हैला हैला रील हुआ’, अशी मजेशीर कॅप्शन देत पुढे हसण्याची इमोजी शेअर केली आहे. याबरोबरच राजदीप व ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या अकाउंटला टॅगदेखील केले आहे.

भुमिजाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या वल्लरी विराजनेदेखील ‘वाह’ अशी कमेंट करीत त्यांचे कौतुक केले आहे. या मालिकेत लीला-रेवतीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनीदेखील सुपर, असे कमेंटमध्ये लिहिले आहे. आमचे इन हाऊन हृतिक व प्रीती झिंटा, धमाल एनर्जी, लव्ह यू अशा संबोधनांची कमेंट सनी द जुगाडू या अकाउंटवरून करण्यात आली आहे. त्याबरोबरच अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्स करीत या ऑनस्क्रीन जोडीचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले नेटकरी?

एका नेटकऱ्याने लिहिले, “सरू गं सरू, तुमचा डान्स भारी.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “क्यूट जोडी सरू व विराज”, असे म्हणत कौतुक केले. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “जबरदस्त डान्स.” एका नेटकऱ्याने, ” ‘नवरी मिळे हिटलरला’मधील हृतिक आणि प्रीती”, असे म्हणत पुढे हार्ट इमोजी शेअर केली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये भूमिजा पाटील ही सरस्वतीची भूमिका साकारताना दिसते; तर राजदीपने विराज ही भूमिका साकारली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असून, ती सर्व प्रेक्षकांची लाडकी असल्याचे दिसते. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांना सासू म्हणून लीला आवडत नाही. त्यामुळे त्या सातत्याने तिला घराबाहेर काढण्यासाठी कट-कारस्थान करताना दिसतात. त्याबरोबरच एजे व लीला यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडते.

हेही वाचा: Video: “माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर…”, अखेर शालीन भनोटने ईशा सिंहबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला…

दरम्यान, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतात. डान्स व रील्सच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlarla fame bhumija patil and rajdeeep dance together on haila haila song vallari viraj commented on video netizen praised says hrithik preity nsp