‘नवरी मिळे हिटलरला'( Navri Mile Hitlarla) ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. एजे व लीला यांच्यामधील कुरबुरी असो किंवा लीला व तिच्या सुनांमधील छोटी-मोठी भांडणं असो, लीलाच्या वडिलांचं तिच्यावरील प्रेम असो किंवा आजीचं तिला समजावून घेणं असो; प्रेक्षकांना ही मालिका भुरळ घालते. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याबरोबरच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. आता असाच एक ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला जहांगीर कुटुंबातील सर्व जण एकत्र जमल्याचे पाहायला मिळत आहे. दुर्गा म्हणते, “एक तर ही मुलगी या घरात राहील किंवा मी राहीन. तुम्हाला निवड करावीच लागेल एजे. लीलाला बायकोचं स्थान द्यायचं आहे की सुनेला तिचा हक्क द्यायचा आहे.” लक्ष्मी म्हणते, “आम्हाला लीला या घरात नकोय.” सरस्वती म्हणते, “तिला घराबाहेर काढा” आणि त्या तिघी एकत्र म्हणतात, “नाही तर आम्ही हे घर सोडू.” त्यावेळी एजेचा मुलगा असे विचारतो की, तुम्हा सगळ्यांना मान्य असेल, तर आपण घरातल्या घरात व्होटिंग घेऊ? त्यानंतर सगळे जण एकेक चिठ्ठी टेबलवर ठेवताना दिसत आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
इन्स्टाग्राम

नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर करताना, “सुनांसाठी एजे लीलाला घराबाहेर काढणार का…?”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “सारखं काय बघावं तेव्हा तीला बाहेर काढतात. आता सगळेच जण आपापल्या सुनांना बाहेर काढत आहेत. लीला, अक्षरा, सावली सगळ्यांना बाहेर काढत आहेत. अजून कोणी राहिले असेल त्यांनापण बाहेर काढा.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “एजे आणि लीला दोघांनीही घरातून बाहेर पडावं. आजींनासुद्धा बरोबर घ्यावं. या कटकटींपासून दूर जातील आणि सुखाचं आयुष्य जगतील. सगळ्यांना एजे-लीलाची किंमत कळेल. प्रेक्षकांना एजे व लीलाचे छान ट्रॅक्स बघायला मिळतील.” दुसरा एक नेटकरी लिहितो, “काय मूर्खपणा लावला आहे?”

हेही वाचा: एकीकडे वसुंधराचं कठोर व्रत, तर दुसरीकडे आकाशवर जीवघेणा हल्ला…; पाहा ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो

दरम्यान, आता एजे लीलाला बाहेर काढणार का, लीलाच्या आयु्ष्यात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader