‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कधी एजे म्हणजेच अभिराम आणि लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात अभिरामने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची लाडकी होताना दिसत आहे. आता मालिकेत नवे वळण आले असून, लीला अभिरामच्या प्रेमात पडल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

झी मराठी या वाहिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये अभिरामने काही दिवसांपूर्वी म्हटल्याप्रमाणे त्याच्या कुटुंबातील सर्व जण क्रूझवर गेले आहेत. यावेळी एजेच्या प्रेमात पडलेली लीला तिच्या मनातील भावना अभिरामला सांगाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वेळा ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, “एजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे”. त्यावर एजे तिला म्हणतो, “बोल.” पण, त्यावर ती काही बोलू शकत नाही.

दारूच्या नशेत लीला एजेला म्हणाली, “तुम्ही फक्त खडूस नाही, तर…”

या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सगळे शॅम्पेन पितात तेव्हा लीलादेखील शॅम्पेन पिताना दिसत आहे. त्यानंतर नशेत ती अभिरामला म्हणते, एजे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर अभिराम म्हणतो, “बोल लीला.” त्यावर लीला, “तुम्ही ना खूप म्हणजे खूप खडूस आहात. फक्त खडूस नाही, हिटलरसुद्धा आहात,” असे म्हणताना दिसत आहे. तिच्या या बोलण्यावर एजे नाराज झाल्याचे दिसत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

आता लीलाच्या या वागण्यामुळे एजे तिच्यावर नाराज होणार का? लीला तिच्या मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त करू शकणार का? एजेच्या मनात लीलाविषयी राग निर्माण करण्यात त्याच्या सुना यशस्वी होणार का?मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: “अनेक बायकांचा नवरा…”, अरबाजबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच Splitsvilla फेम नायराचं मोजक्या शब्दांत स्पष्ट उत्तर, म्हणाली…

दरम्यान, मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अभिरामचे हे दुसरे लग्न आहे. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने दुसरे लग्न करण्यास होकार दिला आहे; मात्र त्याचे लग्न श्वेताबरोबर ठरलेले असते. परंतु, रेवतीला किडनॅप करून लीलाला एजेबरोबर लग्न करण्याची धमकी दिली जाते. तसे केले, तरच रेवतीचा जीव वाचू शकतो, असे तिला सांगितले जाते. त्यामुळे लीला श्वेताला बेशुद्ध करते आणि तिच्या जागी स्वत: मंडपात बसते. एजे आणि लीलाचे अशा प्रकारे लग्न होते. आता हे लग्न अभिरामच्या तीनही सुनांना मान्य नाही. त्यांना लीला अभिरामची पत्नी आणि त्यांची सासू म्हणून नको आहे. त्यामुळे त्या लीलाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.