‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका वेगळ्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या सहज अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. मालिकेतील लीला आणि एजे यांच्यामध्ये सुरू असणारी छोटी-मोठी भांडणे, मैत्री, प्रेम या सगळ्यांचीच प्रेक्षकांना भूरळ पडताना दिसते. आता मालिकेत नवीन वळण आले असून मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची मालिकेचा पुढचा भाग बघण्याची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.
लीलाला घराबाहेर काढल्यानंतर एजेंना येतेय तिची आठवण?
झी मराठी वाहिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एजेला लीलाची आठवण येत असल्याचे दिसत आहे. प्रोमोच्या सुरूवातीला, एजे त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असून दुर्गाचा भाऊ त्याच्यासाठी कॉफी घेऊन येतो. त्यावेळी एजे त्याला म्हणतो, मला स्ट्रॉंग लागते कॉपी, दूध नको आणि साखरसुद्धा नको. त्यावर दुर्गाचा भाऊ म्हणतो, “एवढं सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे…”, त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच एजे त्याला म्हणतो, “लीलाला सांग ना.” या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की एजे त्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत काहीतरी शोधत असतो. ते पाहून त्याची आई त्याला म्हणते, तूच भरलीस ना बॅग? मग विसरशील कसं?त्यावर लगेच तो म्हणतो, “लीला काहीतरी गोंधळ घालून ठेवते.” त्यावर त्याची आई त्याला म्हणते, तू मान्य कर किंवा नको करू पण तुला तिची आठवण येतेय.” दुसरीकडे लीलाचे बाबा तिला विचारतात, सकाळपासून फोन घेऊन फिरतेस, काय झालंय नक्की?
हा प्रोमो शेअर करताना, एजेला ते लीलाला मिस करता आहेत याची जाणीव होईल का? अशी कॅप्शन दिली आहे.
u
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीला आणि एजेचे लग्न झाले आहे. मात्र आता लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. एजेचे हे दुसरे लग्न आहे. एजेच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असले तरी आजही तो तिच्यावर खूप प्रेम करतो. अंतरा आणि एजेच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी लीला त्याच्या पहिल्या पत्नीप्रमाणे म्हणजेच अंतराप्रमाणेच तयार होऊन येते. अंतराची साडी आणि तिचे दागिने घालते. लीला अंतराची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा गैरसमज एजेला होतो आणि तो तिला घर सोडून जायला सांगतो. त्यानंतर लीला तिच्या माहेरी जाते.
आता मालिकेत पुढे काय होणार, लीला तिच्या माहेरी सासरी काय घडले हे सांगणार का, एजे लीलाला परत घरी आणणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.