‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) या मालिकेत लवकरच नवे वळण येणार असून, सगळ्यांना लीलाचा नवीन अवतार पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. सुनांपेक्षा कमी वयाची सासू म्हणजेच लीला; तिच्या तीन सुना तिला घराबाहेर काढण्यासाठी सतत काहीतरी कारवाया करताना दिसतात. कडक शिस्तीचा आणि परफेक्ट असणारा लीलाचा नवरा म्हणजेच एजे आणि याउलट वेंधळी व सतत काहीतरी गोंधळ घालणारी लीला अशा आशयाच्या वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक असल्याचे पाहायला मिळते. आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले होते की, लीला तिच्या सुनांना घाबरायची, त्यांचे ऐकायची, त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या गोष्टी तिला कळायच्या नाहीत. आता मात्र तिचे बदललेले रूप पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी या तिघी घरात गप्पा मारत, पत्ते खेळत बसलेल्या आहेत. तितक्यात दरवाजा उघडतो आणि त्यांच्या समोरच्या टेबलावरचे पत्ते वाऱ्याने इकडे-तिकडे पसरतात. त्या तिघींचे लक्ष दरवाजाकडे जाते, तर त्यांना दारात लीला तिच्या बॅगसह दिसते. दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या तिघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्या विचारतात, “लीला तू इथे?” त्यावर लीला म्हणते, “लीला नाही. सासूबाई म्हणायचं. नाऊ यू फिअर; कारण लीला द सासू इज हिअर. चला कामाला लागा.” असे म्हणत ती चुटकी वाजवते आणि तिच्या तिन्ही सुना साधी साडी नेसलेल्या अवतारात दिसतात. त्यानंतर पाहायला मिळते की, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती भांडी घासताना, फरशी पुसताना, झाडू मारत आहेत आणि लीला त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. दिवाळीचा फराळ बनविताना त्यांची तारांबळ उडताना दिसत आहे. त्यानंतर लीलाचा एक डायलॉग ऐकायला मिळतो, ती म्हणते, “आता खोचायचा पदर आणि विसरायचं हसू; तुम्हाला सरळ करायला येतेय, लीला द सासू.” हे म्हणताना लीला एका मोठ्या खुर्चीत बसली असून, तिची एक सून तिला वारा घालत आहे. इतर दोन सुना काम करीत आहेत.

Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आता सुना अनुभवणार लीलाची सासूगिरी…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

‘नवरी मिळे हिटलर’चा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कमेंट्स केल्या आहेत. “नशीब लीला घरी आली आणि तिची सासूगिरी एकदाची सुरू झाली. लीला आणि एजेचं लग्न झाल्यापासून ज्या गोष्टीची वाट बघत होते, ती गोष्ट एकदाची घडणार”, असे म्हणत एका नेटकऱ्याने आनंद व्यक्त केला आहे. एक नेटकरी म्हणतो, “आता येणार खरी मजा. कारण- सुरू होणार लीलाची सासूगिरी. मी खूप उत्सुक आहे.” एका नेटकऱ्याने म्हटले, “सगळ्यात गरजेचा ट्विस्ट, लीला आता बॉस आहे.”

आणखी एका नेटकऱ्याने मालिकेच्या दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. या प्रोमोवर प्रतिक्रिया देताना त्याने म्हटले, “नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे दिग्दर्शक कधीच नाराज करत नाहीत.” तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, ” ‘होणार सून मी या घरची’च्या सासवांनी चांगली ट्रेनिंग दिली आहे.”

हेही वाचा: पाठकबाईंचं पुनरागमन! अक्षया देवधर ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार, सोबतीला असेल ‘हा’ अभिनेता

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, नुकताच लीलाने अंतरा आणि एजेच्या लग्नाच्या वाढदिवसाला एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये तिने अंतराची साडी नेसली होती, दागिने घातले होते आणि तिच्यासारखी ती तयार झाली होती. एजेच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तिने हे सर्व केले होते. मात्र, एजेचा गैरसमज झाला की, ती अंतराची म्हणजेच त्याच्या पहिल्या बायकोची जागा घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यानंतर तो तिला घराबाहेर काढतो.

आता त्यानंतर ती तिच्या सासरी नव्या अवतारात येत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader