‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) या मालिकेत सध्या लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. रेवती व यशच्या लग्नाची तयारी सुरू आहे. एजे व लीलाने अनेक प्रयत्न करून रेवती व यशचे लग्न ठरवले आहे. यश व रेवती एकमेकांच्या प्रेमात पडले, मात्र यशची बहीण दुर्गाला हे लग्न मान्य नव्हते. तिने या लग्नाला विरोध केला होता. मात्र, लीला व एजेने त्यांचे लग्न व्हावे, यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचे पाहायला मिळाले. अखेरीस त्यांचे लग्न पार पडणार असल्याचे दिसत आहे. यश-रेवतीचे लग्न हे लीलाच्या घरी साधेपणाने होणार असल्याचे एजेने जाहीर केल्यानंतर आता लीलाच्या माहेरी लग्नाची घाई-गडबड सुरू असल्याचे मालिकेत पाहायला मिळणार आहे. आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये लीलावर संकट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लीलाच्या जीवाला धोका…

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, लीलाची मावशी आई तिला ओढत किचनमध्ये आणते आणि तिला रागात विचारते, “मुंडावळ्या कुठे आहेत? रेवूच्या लग्नात विघ्न आणतेस?”, असे म्हणते; हे एजे ऐकतो. त्यानंतर एजे लीलाला मुंडावळ्या आणून देतो व तिला म्हणतो, “मुंडावळ्या बदलल्या तरी कोणाला काही कळणार नाही”, त्यावर लीला म्हणते, मी असं काही केलं ना तर मावशी आईची फसवणूक केल्यासारखं होईल. त्यानंतर लीला संपूर्ण घरात मुंडावळ्या शोधत असल्याचे दिसत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की लीलाला काहीतरी आठवते. ती रेवतीला म्हणते, “रेवू आत जा आणि पटकन हेल्मेट व चावी घेऊन ये.” त्यानंतर लीला गडबडीत घराबाहेर पडताना दिसत आहे. लीलाच्या घराबाहेर सजावटीचे काम सुरू आहे. एक व्यक्ती सजावट करत असल्याचे दिसत आहे. तो एका उंचीवर उभा आहे. लीलाला पाहताच तो विक्रांतला फोनवर म्हणतो, “साहेब टार्गेट अगदी निशाणाच्या खाली आहे, काम करून टाकू?”, त्यावर विक्रांत म्हणतो, “मूर्खा विचारतोस काय? कर ना.” त्यानंतर ती व्यक्ती हातातील जड वस्तू लीलाच्या डोक्यावर टाकताना दिसतो. आता लीलाच्या डोक्यात ती वस्तू पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, लीलाच्या जीवाला धोका..? अशी कॅप्शन दिली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी विक्रांतच्या दुष्कृत्यामुळे त्याला एजेने तुरुंगात पाठविले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी विक्रांत तुरुंगातून बाहेर आला आहे. तो मन्याच्या वेशात लीलाच्या आयुष्यातदेखील आला आहे. त्याला एजे व लीलाचा बदला घ्यायचा आहे. या सगळ्यात विक्रांत किशोरला मदत करत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, विक्रांतमुळे लीलाच्या जीवाला धोका निर्माण होणार का, यश-रेवतीच्या लग्नात काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlarla new promo during yash revati marriage danger to leelas life watch nsp