काही मालिकेतील पात्रे प्रेक्षकांना भुरळ पाडतात. एजे व लीला अशा पात्रांपैकी एक आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. एजे व लीला यांच्यामधील छोट्या-मोठ्या कुरबुरी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. लीलाने तिचे एजेवर प्रेम असल्याचे सर्वांना सांगितले आहे. तिने तिच्या मनातील भावना एजेलासु्द्धा सांगितल्या आहेत. मात्र, त्याने त्याचे पहिल्या पत्नीवर अंतरावर प्रेम असल्याचे स्पष्ट सांगितले होते. आता मात्र हळू हळू एजेदेखील लीलाच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळते. या सगळ्यात एजेच्या सूना लीलाला घराबाहेर काढण्यासाठी अनेकविध गोष्टी करताना दिसतात. आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून एजे व लीलामध्ये गैरसमज निर्माण होणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सुनांच्या कारस्थानामुळे लीला-एजेमध्ये गैरसमज निर्माण होणार?

नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लीला तिच्या खोलीतून बाहेर पडत आहे. त्याचवेळी लक्ष्मी व सरस्वती येतात व त्या एकमेकींना धडकतात. लीलाच्या हातातील कंगण खाली पडतात. ते पाहताच सरस्वती म्हणते, “वहिनी हे तेच कंगण आहेत ना?” लीला विचारते, “तेच म्हणजे?” लक्ष्मी म्हणते, “जहांगिरदारांचे कंगण.” त्यानंतर लीला तिथून निघून जाते. लक्ष्मी सरस्वतीला म्हणते की त्या कंगणबद्दल बोलायची काही एक गरज नाहीये. कारण थोड्याच वेळात या घरात एक बॉम्ब फुटणार आहे. लीला ते कंगण हातात घालते. ती जेव्हा तिच्या खोलीत जाते, त्यावेळी एजेला तिच्या हातातील ते कंगण दिसतात. तो लीलाचा हात धरतो व त्या कंगणकडे तो एकटक बघत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

Tula Shikvin Changalach Dhada New Promo
भुवनेश्वरीला कळणार अक्षराचं मोठं गुपित! सुनेबद्दलची ‘ती’ बातमी ऐकून सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार…; पाहा प्रोमो
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Zee Marathi Lakshmi Niwas Promo
लक्ष्मी-श्रीनिवास तुरुंगात…; लेक भावनामुळे ओढवलं मोठं संकट! ‘त्या’ निर्णयाचा झाला ‘असा’ परिणाम, पाहा प्रोमो
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सुनांचे कारस्थान लीला अभिरामच्या नात्यात गैरसमज निर्माण करणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजे लीलाबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. एजेपेक्षा लीला वयाने लहान आहे. वेंधळेपणा करणारी, धडपडी आहे. स्वत:च्या कुटुंबावर अतोनात प्रेम करणारी लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असणारा, कडक शिस्तीचा एजे हा अजूनही त्याच्या पहिल्या पत्नीवर प्रेम करताना दिसतो. आता मात्र एजे व लीला यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे.

हेही वाचा: Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

आता सुनांच्या कारस्थानामुळे एजे-लीलामध्ये गैरसमज निर्माण होणार का, त्यांच्या पुन्हा दुरावा येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader