टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. मालिकेत उद्याच्या भागात काय बघायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते. आता कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) ही झी मराठी वाहिनीवरील मालिका. आता या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.

Navri Mile Hitlerla Abhiram and leela dance on khandala ghat song watch video
Video: ‘गोविंदा आला रे’ कार्यक्रमात एजे आणि लीलाचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “एकदम झकास…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Navri Mile Hitlarla
Video : लीलाने श्वेताचा केला पर्दाफाश; एजेने दाखवला थेट घराबाहेरचा रस्ता
Navri Mile Hitlerla Upcoming Episode leela abhiram celebrate dahi handi
नवरी मिळे हिटलरला : लीला फोडणार दहीहंडी, पाहायला मिळणार अभिरामबरोबरचा रोमँटिक क्षण
zee marathi savlyachi janu savali marathi serial starcast
तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
zee marathi new serial savlyachi janu savali
‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Punha Kartvya Aahe
Video: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील ‘हा’ व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, “लेखकाला बुद्धी…”

लीलाचं हिटलरबद्दलचं मत बदलणार?

प्रोमोच्या सुरुवातीला लीला विचारते, “मला नक्की काय काम दिलंय?” तर त्यावर तिला वेटरचा जॉब एजेने दिला आहे, हे समजते. ती वेटरच्या ड्रेसमध्ये तयार होऊन एजेला भेटते आणि त्याला विचारते, “मी कामाला सुरुवात करू?” त्यावर एजे तिला काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. त्यानंतर लीला दिवसभर काम करीत असल्याचे पाहायला मिळते. संध्याकाळी जेव्हा ती घरी जाते, तेव्हा ती बेडवर ठेवलेल्या हिटिंग पॅडवर बसते. एजे आल्यावर त्याला विचारते, “हिटिंग पॅड का ठेवलं बेडवर?” त्यावर एजे तिला म्हणतो, “आज तू दिवसभर उभे राहून काम केलेस, म्हणून पाय शेकायला तो हिटिंग पॅड ठेवला होता.” त्यानंतर लीला पाय शेकताना, मनातल्या मनात हिटलर वाटतात तितके वाईट नाहीत, असे म्हणताना दिसत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, लीलाचं हिटलरबद्दलचं मत बदलतंय का…? अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीलाची बहीण रेवती एजेला ओवाळून रक्षाबंधनाचा सण साजरा करते. ओवाळणीत एजे तिला पैशांचा चेक देतो. ते लीलाला आवडत नाही. तिला ते पैसे त्याला परत करायचे आहेत. ती त्याला पैसे परत घेण्याविषयी विचारते; पण तो पैसे परत घ्यायला नकार देतो. लीला एजेला पैसे परत करण्यासाठी कोणतेही काम द्या; ते मी करेन, असे म्हणते. आता एजेने तिला वेटरचे काम दिले असून, लीला ते काम यशस्वीपणे पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Video: “तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं बंद होणार”, भडकलेल्या रितेश देशमुखने जान्हवीला काढलं घराबाहेर

दरम्यान, आता मालिकेत कोणते नवे वळण येणार, लीला-एजेचे नाते कोणते वळण घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.