टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या काही मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. शा मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) ही मालिका आहे. या मालिकेतील कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.

क्रूझवर लीला प्रेमाची कबुली देणार…

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून अभिरामचे कुटुंब क्रूझवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. तिथे एजे आणि लीला यांच्यामधील अनेक गंमती जमती घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. लीला दारू पिल्याचेदेखील दिसत आहे. आता ती अभिरामला तिच्या मनातील त्याच्याविषयीच्या भावना सांगू शकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हा प्रोमोमध्ये, क्रूझवर प्रेमाच्या लाटा उसळणार, बेभान मनाला भेटीची ओढ लागणार आणि एजेच्या प्रेमात बुडालेल्या लीलाला मनातलं वादळ ओठांवर आणावच लागणार, असे ऐकायला मिळत आहे.

नवरी मिळे हिटलरला इन्स्टाग्राम

झी मराठीने या प्रोमोला, ‘लवकरच, मनातलं वादळ ओठांवर येणार… लीला प्रेमाची कबुली देणार का…?’ अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मालिकेत दाखविल्याप्रमाणे, श्वेता आणि एजे यांचे लग्न ठरलेले असते. मात्र, रेवतीला किडनॅप करून लीलाला एजेबरोबर लग्न करण्याची धमकी दिली जाते. तसे केले तरच रेवतीचा जीव वाचू शकतो, असे तिला सांगितले जाते; त्यामुळे लीला श्वेताला बेशुद्ध करते आणि तिच्या जागी स्वत: मंडपात बसते. एजे आणि लीलाचे अशा प्रकारे लग्न होते. श्वेता ही लक्ष्मीची नातेवाईक असल्याने ती त्यांच्या घरी राहायला येते. एजे आणि लीलाचे लग्न मोडावे यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसते. त्याबरोबरच श्वेता ही लक्ष्मी, सरस्वती यांच्या मदतीने लीलाला त्रास देत असते. आता मात्र श्वेताला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सरस्वती आणि लक्ष्मी लीलाला घराबाहेर काढण्यासाठी सतत कटकारस्थान करत असल्याचे दिसते.

हेही वाचा: बॉडीगार्डने केलेल्या चुकीबद्दल अरिजित सिंहने मागितली चाहतीची माफी; म्हणाला, “तुमचे संरक्षण…”

मालिकेत नुकतेच पाहायला मिळाले, सरस्वती आणि लक्ष्मी लीलाची माफी मागण्याचे नाटक करतात. आणि एजेला लीला आवडेनाशी होईल, असे काहीतरी करण्याचा प्लॅन करतात. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.