काही मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. काही मालिका अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतात. अशा मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) ही मालिका आहे. मालिकेत आता नवे वळण पाहायला मिळत आहे. आता मालिकेत पुढच्या भागात काय होणार, याचा व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे.

झी मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की, अभिरामच्या कुटुंबातील सर्व जण एकत्र जमले आहेत. अभिराम त्यांना म्हणतो, तुम्हा सगळ्यांना हॉलमध्ये काही कारणासाठी बोलवलेलं आहे. आपण दरवर्षी विसर्जन झाल्यानंतर कुठेतरी बाहेर फिरायला जातो. यावर्षीदेखील आपण चाललोय. आपण यावेळी एका क्रूझवर चाललोय.” त्याच्या या बोलण्यावर घरातील सर्व जण खूश होताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की, लीला एजेच्या फोटोबरोबर बोलत आहे. ती म्हणते, “एजे, खरंतर तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच कळत नाही.” तिचं हे बोलणं आजी ऐकतात आणि लीलाला म्हणतात, “प्रेमात पडली आहेस ना? मग अभिरामला कधी सांगणार आहेस हे सगळं?” त्यावर लीला म्हणते, म्हणजे मला सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच कळत नाहीये.” आजी तिला समजावत म्हणतात, “अगं असं काय? तू आता जात आहेस ना फिरायला, तिथे वातावरणपण छान असेल.” लीला म्हणते, “आता काहीही झालं तरी मी त्यांना सगळं सांगेन.”

इन्स्टाग्राम

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा व्हिडीओ शेअर करताना झी मराठीने, ‘लीला अभिरामला मनातलं सगळं सांगू शकेल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, श्वेता आणि एजे यांचे लग्न ठरलेले असते. मात्र, रेवतीला किडनॅप करून लीलाला एजेबरोबर लग्न करण्याची धमकी दिली जाते. तसे केले तरच रेवतीचा जीव वाचू शकतो, असे तिला सांगितले जाते; त्यामुळे लीला श्वेताला बेशुद्ध करते आणि तिच्या जागी स्वत: मंडपात बसते. एजे आणि लीलाचे अशा प्रकारे लग्न होते. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मोठे गैरसमज होते, मात्र आता लीला अभिराम म्हणजेच एजेच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: भर कार्यक्रमात किस, प्रपोज ते लग्नाची इच्छा…; निक्की तांबोळीचं ‘या’ व्यक्तीबरोबर जोडलेलं नाव; पाहा ‘ते’ व्हिडीओ

आता लीला तिच्या भावना अभिरामला सांगू शकणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.