‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून या मालिकेचे नाव घेतले जाते. कलाकारांचा अभिनय, पात्रांमधील वेगळेपणा, मालिकेचे कथानक अशा विविध गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. या मालिकेतील एजे व लीला ही पात्रे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसतात. त्यांच्यातील केमिस्ट्री लोकप्रिय ठरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एजे लीलाच्या प्रेमात कधी पडणार, तो तिच्या प्रेमात असल्याची जाणीव त्याला कधी होणार, याची प्रेक्षक वाट पाहत असलेले सोशल मीडियावरील कमेंट्समधून दिसत होते. आता समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार असल्याचे दिसत आहे.

लीलाशिवाय तरी कसा जगेन…

नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला ऐकायला मिळते की, एजे मन आणि बुद्धीच्या खेळात अडकणार, एजेसमोर त्याची दोन मने उभी आहेत. त्याचा स्वत:शीच संवाद चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे एक मन म्हणते, अंतरा वेगळी होती, लीला माहितेय ना कशीये तुला? त्याचे दुसरे मन म्हणते, असेल ती वेंधळी, पण लीला वाईट नाहीये. त्याचे पहिले मन म्हणते की ही पत्नीची कर्तव्ये आहेत. त्याचे दुसरे मन म्हणते की तू अंतरावर प्रेम करतोस, पण लीलाने तुला आहे तसं स्वीकारलं आहे. त्याचे पहिले मन म्हणते की, तरीही एजे अंतराशिवाय जगू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. तितक्यात एजे म्हणतो, लीलाशिवाय तरी कसा जगेन मी. शेवटी एजे अंतराच्या फोटोसमोर जातो. तिला म्हणतो, “सॉरी अंतरा, मला तुझी जागा आता लीलाला द्यावीच लागणार आहे, मी लीलाच्या प्रेमात पडलो आहे.”

Paaru
“तुला माझ्या पायाशी…”, आदित्यला त्रास देण्यासाठी अनुष्का काय करणार? ‘पारू’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
shashank ketkar will become father for second time
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिली गुडन्यूज, पत्नी व मुलासह केलं खास फोटोशूट
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
tharla tar mag fame sayali kusum and madhubhau dances on bollywood song
फिर भी ना मिला सजना…; ‘ठरलं तर मग’ फेम सायली, कुसुम अन् मधुभाऊंचा जबरदस्त डान्स! ‘ते’ गाणं ऐकून नेटकरी म्हणाले…
aai kuthe kay karte fame ashvini mahangade dance on natarang ubha song in kaumudi walokar sangeet ceremony
Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेचा ‘नटरंग उभा’ गाण्यावरील सुंदर नृत्याविष्कार पाहिलात का? नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
Muramba
Video: जीव देण्यासाठी निघालेल्या अक्षयला माहीमुळे मिळणार जगण्याची नवी उमेद; पाहा ‘मुरांबा’ मालिकेत नेमकं काय घडणार?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मन आणि बुद्धीच्या खेळात एजे कुठल्या निष्कर्षावर पोहोचणार…?” अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

नवरी मिळे हिटलरला मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केल्याचे कमेंट्समधून पाहायला मिळत आहे. अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “शेवटी एजेला त्याला लीलाविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “नवीन वर्षाची छान सुरुवात झाली. आता वर्षभर एजे-लीलाची लव्ह स्टोरी दाखवा. त्यांचा सुखी संसार दाखवा आणि प्लीज अंतराला परत आणू नका. कुठलाही निगेटिव्ह ट्रॅक दाखवू नका. एजे आणि अंतराचं प्रेम आतापर्यंत खूप निर्मळ, निःस्वार्थी दाखवल आहे, ते तसंच राहूदे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “मला तर वाटते की अंतराचा पुनर्जन्म लीला आहे.”

हेही वाचा: Video: जीव देण्यासाठी निघालेल्या अक्षयला माहीमुळे मिळणार जगण्याची नवी उमेद; पाहा ‘मुरांबा’ मालिकेत नेमकं काय घडणार?

आता एजे लीलाला त्याच्या प्रेमाविषयी कधी सांगणार, मालिकेत पुढे काय होणार, एजेच्या सुना काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader