‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlarla) या मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. मालिकेचे कथानक आणि एजे व लीला ही पात्रे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आता या मालिकेत यश व श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. हे लग्न स्वत: एजेने ठरवले आहे. मात्र, यशचे प्रेम लीलाची बहीण रेवतीवर असते. मात्र, दुर्गाच्या दबावामुळे यश आणि रेवती एजेला खरे सांगत नाहीत. आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

n

लीला नेमकं काय करणार?

‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रेवती दवाखान्यात असून एजे तिला भेटायला गेला आहे. रेवती रडत असून, “जे तू मला सांगितलं नाहीस, ते तुझ्या अश्रूंनी मला सांगितलं,” असे एजे तिला म्हणून तिचे अश्रू पुसतो. तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, “तुझ्यापुढे माझा शब्द, माझं प्रॉमिस, सगळ्याची व्हॅल्यू झिरो आहे. दुसरीकडे यश आणि श्वेताचा साखरपुडा चालू असल्याचे दिसत आहे. गुरुजी सांगतात, “आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला.” तितक्यात वेश बदलून लीला येते आणि “थांबा”, असे म्हणते. कसला तरी धूर करते. थोड्या वेळाने सर्वांच्या लक्षात येते की, यश जागेवर नाही. लक्ष्मी दुर्गाला म्हणते, “वहिनी यश कुठेय?” त्यानंतर दुर्गा यशला हाक मारताना दिसत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘एजे रेवतीचं मन ओळखणार; पण लीला वेगळीच खेळी खेळणार…!’, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी एजेबरोबर ठरलेले लग्न मोडले, याचा त्रास होत असल्याचे सांगत श्वेता एजेसमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे एजेला तुरुंगातदेखील जावे लागते. एजे बाहेर आल्यानंतर श्वेता त्याची माफी मागते. एजे तिच्या लग्नाची जबाबदारी घेतो आणि तिचे लग्न यशबरोबर ठरवतो. मात्र, यशचे प्रेम लीलाची बहीण रेवतीवर असते. लीला रेवतीची समजूत काढते आणि तिचे प्रेम यशवर आहे, हे एजेला सांगण्यासाठी तयार करते. त्या एजेकडे जात असतात. त्याच वेळी लीला आणि रेवतीचा अपघात होतो. दोघींना दवाखान्यात दाखल केले जाते. एजे त्यांना भेटायला येतो. लीला त्याला म्हणते, हा अपघात कोणी केला आहे, ते मला माहीत आहे.

हेही वाचा: ‘ठरलं तर मग’ फेम सायलीचं शिक्षण माहितीये का? मिळवलंय Gold Medal; उच्चशिक्षित जुई अभिनयाकडे कशी वळली?

u

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, सत्य समजल्यानंतर एजे आणि लीला एकत्र येणार का, की पुन्हा त्यांच्यात भांडण होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. श्वेताचे सत्य सगळ्यांसमोर कसे येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlarla twist new promo leelas unique trick to stop yash and shweta engagement nsp