‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेत सध्या जहागीरदार कुटुंब संक्रांत साजरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संक्रांतीसाठी सर्वांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती यांच्याबरोबर लीला व आजीसुद्धा सुंदर तयार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, एजेने लीलाची पहिली संक्रांत खास करण्यासाठी स्वत: हलव्याचे दागिने बनवले आहेत. एजेने लीलाला हे दागिने घालावे असे आजीने सुचवल्यानंतर त्याने स्वत: तिला हलव्याचे दागिने घातल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून मालिकेत पुढे काय घडणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
तुला मन्याबरोबर टीम…
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, विराज आजीला म्हणतो की, आजी या स्पर्धेनंतर आम्हाला एका मीटिंगला जायचं होतं, पण मला आता असं वाटतं नाही की आम्ही त्या मीटिंगला उपस्थित राहू शकतो. त्यानंतर आजी म्हणते की, मला असं वाटतं की आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. लीला त्यावर बरोबर आहे असं म्हणत एजेला विचारते, “मी तुमच्या टीममध्ये?”, त्यावर एजे तिला उलट प्रश्न विचारत म्हणतो, “का? तुला मन्याबरोबर टीम बनवायची होती ना?” त्यानंतर लीला आजीला विचारते की आजी आपण एक टीम होऊयात का? लीलाच्या या प्रश्नावर आजी म्हणते, “मला जमेल असं मला काही वाटत नाही. त्यानंतर लीला रेवतीला विचारत असते तितक्यात यश तिला म्हणतो, आमची आधीच टीम झालेली आहे. त्यानंतर ती दुर्गाला विचारते की दुर्गा आपण होऊया का एक टीम? दुसरीकडे पाहायला मिळते की किशोर व विक्रांत यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. किशोर विक्रांतला म्हणतो की, अरे विक्रांत तुला एजे व लीलाचा बदला घ्यायचा असेल तर तुला माझ्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीये. याचवेळी विक्रांतला दुर्गाचा फोन येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे एजेने त्याच्या मनातील भावना उघडपणे सांगाव्यात, व्यक्त कराव्यात यासाठी लीला व आजी मिळून एक योजना बनवतात. मन्या नावाचे एक काल्पनिक नाव सांगत तो लीलाचा लहानपणीचा मित्र असल्याचे एजेला सांगतात. लीला मन्याला भेटायला जाते, असे जेव्हा एजेला सांगते तेव्हा एजेदेखील तिच्याबरोबर जातो. कॅफेमध्ये गेल्यानंतर एजेला दाखविण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीची ओळख मन्या म्हणून करून देते. त्यानंतर हा मन्या सतत लीलाच्या आयुष्यात डोकावताना दिसतो. हा मन्या म्हणजे विक्रांत आहे. एजे व लीलाचा बदला घेण्यासाठी त्याने हे रूप घेतले आहे. आता त्याच्यामुळे लीला व एजे एकत्र येणार की एकमेकांपासून दुरावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.