‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. १८ मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. मालिकेतील पात्रांनी देखील प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. त्यामुळे मालिकेची वेळ प्राइम टाइम नसली तरी प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला टीआरपी देखील चांगला मिळत आहे. मालिकेत राकेशने AJ (अभिराम जहागीरदार)ची भूमिका साकारली असून वल्लरीने लीला भूमिका निभावली आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडू लागली आहे. अशातच लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी विराजचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक होतं आहे.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, प्रतिक्रियेचा पडतोय पाऊस, काय आहे नेमकं? पाहा…

गौरव राणा दिग्दर्शित ‘मैं लड़ेगा’ (MAIN LADEGA) या चित्रपटात वल्लरी झळकली आहे. या चित्रपटाची कथा आकाश प्रताप सिंह यांच्याभोवती फिरते. ‘बेबी’ चित्रपटात झळकलेला अभिनेता आकाश प्रताप सिंहने ही प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘मैं लड़ेगा’ चित्रपटात वल्लरी आकाशच्या मैत्रिणीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.

२६ एप्रिलला वल्लरीचा ‘मैं लड़ेगा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण वल्लरीच्या कामाचं कौतुक करत आहेत. “उत्कृष्ट काम. पुन्हा एकदा भारी काम केलं आहेस,” असं एकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर वल्लरीच्या चित्रपटातला फोटो शेअर करत लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, वल्लरीने याआधी हिंदीतील मालिका, चित्रपटात काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘कन्नी’ मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वल्लरीच्या सोबतीला अभिनेत्री हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत हे कलाकार झळकले होते.

हेही वाचा – अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं लग्नानंतर पत्नीबरोबर देवदर्शन, फोटो शेअर करत म्हणाला…

याशिवाय वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. Bath and Barks असं तिच्या सलून नाव आहे. दादरमधील गोखले रोड येथे वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. बरेच मराठी कलाकार आपल्या प्राण्यांचं ग्रुमिंग करण्यासाठी वल्लरीच्या ग्रुमिंग सलूनमध्ये घेऊन जातात. अभिनयाबरोबर वल्लरी हा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitler la fame actress vallari viraj appeared in the main ladega hindi movie pps