‘झी मराठी’ वाहिनीवर १८ मार्चपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ नवी मालिका सुरू झाली. आज या मालिकेला एक महिना पूर्ण होतं आहे. अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. राकेशने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच लीला म्हणजे वल्लरी विराजने चाहत्यांशी संवाद साधला आणि चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर वल्लरीने दिली.
वल्लरी विराजने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांनी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी तिला आवडणाऱ्या कलाकारापासून ते तिचं शिक्षण असे अनेक प्रश्न विचारले. तिला एकदा चाहत्याने विचारलं की, तुझा आवडता कलाकार कोणता? ज्याबरोबर तुला काम करायला आवडेल ते तुझं स्वप्न आहे. यावर वल्लरीने अभिनेत्री मुक्ता बर्वेचा फोटो शेअर करून उत्तर दिलं.

त्यानंतर अभिनेत्रीला आवडत्या सहकलाकारांविषयी प्रश्न विचारला. तेव्हा वल्लरीने सांगितलं, “रेवू म्हणजे अभिनेत्री आलपिनी निसळ आणि मावशी आई म्हणजेच अभिनेत्री शितल क्षीरसागर” हे दोन सहकलाकार वल्लरीला आवडतात.

तसेच वल्लरीला “तुझं शिक्षण काय?” असा देखील एका चाहत्याने प्रश्न विचारला. यावर वल्लरी म्हणाली, “BFM Graduate (बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स, Bachelor of Financial Markets)”
हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानचा कधी क्रेझी अंदाज पाहिलात का? अभिनेत्रीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, वल्लरीने ‘नवरी मिळेल हिटलरला’ मालिकेपूर्वी बऱ्याच मालिका व चित्रपटात काम केलं आहे. तिने तिच्या अभिनयाचा ठसा हिंदीत उमटवला आहे. गेल्या महिन्यात तिचा ‘कन्नी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वल्लरीच्या सोबतीला हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत हे कलाकार होते.