सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. पण, या दिवाळीच्या उत्साही वातावरणात अनेक अपघात होतं असतात. असाच काहीसा अपघात ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री वल्लरी विराजबरोबर बालपणी झाला होता. या अपघाताचा प्रसंग तिने नुकताच सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम वल्लरी विराजचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वल्लरीने बालपणी झालेल्या अपघाताविषयी सांगितलं. ती म्हणाली, “हाय, दिवाळी आलीये तर मला माझ्या लहापणीचा एक किस्सा आठवतोय तो मी तुम्हाला सांगते. तर काय झालं होतं, आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी लहान असताना फटाके फोडत होतो. तो त्रिकोणी अनार (पाऊस) असतो. तो उभा लावायचा असतो. तेव्हा आम्हाला मोठे लोक सांगत होते, आम्ही असताना फटाके फोडा, एकटे फटाके फोडू नका. पण, आम्ही हट्टाने, मुद्दामून ते करायला गेलो. मज्जा म्हणून फटाके फोडायला गेलो आणि तो अनार आम्ही वाकडा लावला. कारण तेव्हा आम्हाला काही कळतं नव्हतं. काय करायचं? माहित नव्हतं.”

हेही वाचा – Bigg Boss 18: नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान चुम दरांगकडून झाली ‘ही’ चूक; चौथ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

“आम्ही तो आडवा लावल्यामुळे तो आडवा फुटला. त्यामुळे तो माझ्या आईच्या साडीला लागला आणि साडीने पेट घेतला. त्यामुळे खूप गोंधळ झाला. कशीबशी ती आग विझवली. नशीबाने माझ्या आईला काही भाजलं नाही. फक्त साडीच काय ती जळली. मी आता एवढंच सांगेन दिवाळी येतेय. तर लहान मुलं-मुली फटाके फोडतील. त्यांनी काळजीपूर्वक फटाके फोडा. मोठे आजूबाजूला असतानाच फटाके फोडा. माझ्याबरोबर अपघात जसा होता होता राहिला. तसा तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतेय. बाकी मज्जा करा. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा,” असं वल्लरी विराजने सांगितलं.

हेही वाचा – Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: सासुरवाडीत झाली गडबड, सूर्या आणि डॅडी प्यायले भांग अन् मग…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नेमकं काय घडलं? वाचा

दरम्यान, वल्लरी विराजच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेआधी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि मालिकाविश्वात काम केलं आहे. याशिवाय वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. Bath and Barks असं तिच्या सलून नाव आहे. दादरमधील गोखले रोड येथे वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. बरेच मराठी कलाकार आपल्या प्राण्यांचं ग्रुमिंग करण्यासाठी वल्लरीच्या ग्रुमिंग सलूनमध्ये घेऊन जातात. अभिनयाबरोबर वल्लरी हा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitler la fame actress vallari viraj tells that incident of childhood during diwali pps