Navri Mile Hitlerla : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका आता लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील एजे व लीलाच्या जोडीने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली आहेत. अभिनेता राकेश बापटने एजे (अभिराम जहागीरदार)ची, तर अभिनेत्री वल्लरी विराजने लीलाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहेत. त्यामुळेच एजे व लीला घराघरात पोहोचले आहेत. अशातच दोघांच्या एका जबरदस्त परफॉर्मन्सचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जन्माष्टमी व दहीहंडी निमित्ताने ‘झी मराठी’ वाहिनीवर आज ‘गोविंदा आला रे’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात ‘झी मराठी’च्या मालिकांमधील जोड्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेतील एजे व लीलाने देखील भन्नाट डान्स केला आहे, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Navri Mile Hitlarla
“दोघांचं भांडण…”, अनोळखी मन्याच्या ‘त्या’ कृतीमुळे लीला-एजेमध्ये येणार दुरावा? नेटकरी म्हणाले, “ट्विस्ट छान आहेत; पण…”

हेही वाचा – कंगना रणौत यांना ‘संजू’ चित्रपटात काम करण्याची मिळाली होती संधी; म्हणाल्या, “रणबीर कपूर स्वतः माझ्या घरी आला अन्…”

‘झी मराठी’ने सोशल मीडियावर एजे व लीलाचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एजे व लीला ‘येरेयेरे पैसा’ चित्रपटातील ‘खंडाळा घाट’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा या जबरदस्त परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

एजे व लीलाच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप सुंदर डान्स आणि खूपच सुंदर जोडी”, “एजे लीलाची परफेक्ट जोडी”, “एकदम झकास परफॉर्मन्स”, “एजे-लीला खूप मस्त डान्स केला”, “सुपर आणि जोडी नंबर”, एक अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – ठरलं तर मग : प्रियाने धक्का मारताच सायली जिन्यावरून घसरली! बायकोला बेशुद्ध पाहताच अर्जुन बिथरला…; पाहा नवीन प्रोमो

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेत सध्या लीलाचं हिटलर एजेबद्दलचं मत हळूहळू बदलताना दिसत आहे. एजेची दुसरी बाजू आता समोर येत आहे. त्यामुळे दोघांचं नातं अजून खुलताना पाहायला मिळत आहे. लवकरच लीला एजेच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करताना दिसणार आहे. यावेळी एजे लीलाला कसा हातभार लावतो? तिची कशी काळजी घेतो? हे पाहायला मिळणार आहे.

Story img Loader