‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. एजे ( अभिराम ) आणि लीलाचं लग्न झाल्यापासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मालिकेतील कलाकारांच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी सेटवरील मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच लक्ष्मी म्हणजेच अभिनेत्री सानिका काशीकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कलाकार किशोर कुमार यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा – एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
या व्हिडीओमध्ये सानिकासह अभिनेत्री वल्लरी लोंढे ( लीला ), शर्मिला शिंदे ( दुर्गा ), भूमिजा पाटील ( सरस्वती ) डान्स करताना पाहायला मिळत आहेत. या सर्वांनी किशोर कुमार यांचं ‘ईना मीना डीका’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या डान्सचं कौतुक इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी केलं आहे.
हेही वाचा – Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
हेही वाचा – “बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
मालिकेत सध्या काय सुरू आहे?
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेत आजीने घराची जबाबदारी लीलाच्या हाती दिली आहे. लीला जहागीरदारांचं घर पूर्णपणे व्यवस्थित सांभाळले, अशी आजीला खात्री आहे. त्यामुळे आता आजीने घराच्या चाव्या लीलाला दिल्या आहेत. पण, हे लीलाच्या सूना दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी यांच्या डोळ्यात खुपलं आहे. त्यामुळे दुर्गा याला विरोध करते. मात्र लीला तिला आव्हान देते. जर घराची जबाबदारी व्यवस्थितरित्या सांभाळली तर घराच्या चाव्या दुर्गा स्वतःच्या हाताने पुन्हा लीलाच्या हातात देईल, असं आव्हान देते. त्यामुळे आता लीला ही जबाबदारी कशी पेलणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.