Navri Mile Hitlerla: हो, नाही म्हणता म्हणता अखेर एजे (अभिराम जहागीरदार) आणि लीला लग्नबंधनात अडकले. लीलाने एजेशी लग्न न करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अखेर किशोर जहागीरदारने केलेल्या प्लॅनिंगमुळे लीलाला एजेशी लग्न करणं भाग पडलं. लवकरच एजे व लीलाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या इन्स्टाग्राम पेजवर एजे-लीलाच्या रिसेप्शन सोहळ्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. एजे-लीलाच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी ‘झी मराठी’च्या परिवारातील खास सदस्य उपस्थितीत राहणार असून जबरदस्त डान्स देखील करणार आहेत. ५ जुलैला एजे-लीलाचा रिसेप्शन सोहळा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘कोंबडी पळाली’च्या चित्रीकरणादरम्यान झालेला घोळ, प्रसिद्ध अभिनेत्याने केलं होतं सहाय्यक दिग्दर्शकाचं काम; वाचा ‘जत्रा’विषयी न माहिती असलेल्या गोष्टी

महाराष्ट्राचे लाडके अधिपती-अक्षरा, अर्जुन-अप्पी आणि आदित्य-पारू एजे-लीलाच्या रिसेप्शन सोहळ्याला खास हजेरी लावणार आहेत. एवढंच नव्हेतर प्रेक्षकांच्या या लाडक्या जोड्या डान्स देखील करणार आहेत. तसंच जहागीरदार कुटुंब, लीला, रेवतीचा देखील खास परफॉर्मन्स होणार आहे. त्यामुळे आता एजे-लीलाचा रिसेप्शन सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा – नव्या घराच्या नेमप्लेटवर का नाही रुपाली भोसलेचं नाव? अभिनेत्री स्वतः खुलासा करत म्हणाली, “माझं कायम…”

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता राकेश बापटने एजे हे पात्र साकारलं असून अभिनेत्री वल्लरी विराज लीला या पात्रात दिसत आहे. तसंच दुर्गा, अंतरा, लक्ष्मी, सरस्वती, सरोजिनी, किशोर जहागीरदार अशी सगळी पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळात गरजेचा असलेला टीआरपीही ‘नवरी मिळे हिटलरला’ चांगला आहे.

हेही वाचा – “दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज…”, क्षितिज पटवर्धनने राहुल द्रविडसाठी लिहिलेल्या खास पोस्टने वेधलं लक्ष

मागील आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा टीआरपी वाढल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची निर्मिती असलेली ही मालिका टीआरपी यादीत १८व्या क्रमांकावर असून २.६ रेटिंग मिळालं आहे.