‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla ) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका असून या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. रंजक वळणांमुळे मालिकेत पुढे काय होणार, ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते. एजे व लीलाची जोडी प्रेक्षकांची लाडकी आहेत. त्यांच्यातील भांडणे असो व त्यांच्यातील प्रेम हे जोडपे नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरते. लीला व एजेचे लग्न हे अपघाताने झाले होते. मात्र, तरीही त्यांनी हे टिकवले. लग्नानंतर जेव्हा लीलाला एजेचा खरा स्वभाव कळाला. त्याची चांगली बाजू व खडूस वागण्यामागचे कारण समजल्यानंतर तीने त्याला समजून घेण्यास सुरूवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लीला एजेच्या प्रेमात पडली. विशेष बाब म्हणजे तीने तिचे प्रेम सर्वांसमोर व्यक्तही केले. मात्र, एजेने तिला त्याच्या मनात असे काहीही नसल्याचे सांगितले. हळूहळू लीलाचा अल्लडपणा, गोंधळ घालण्याचा तिचा स्वभाव यापेक्षाही लीलाचा सर्वांना मदत करण्याचा स्वभाव, तिचा प्रेमळपणा, समजूतदारपणा एजेला समजला तेव्हा तोदेखील तिच्या प्रेमात पडला. गेल्या काही दिवसांपासून त्याला तो लीलाच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली आहे. तो त्याच्या कृतीतून लीलाविषयीचे प्रेम व्यक्त करत होता. लीलादेखील ते समजत होते. एजेने लीलासाठी रेल्वेच्या लेडीज डब्यातूनही प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. आता एजे लीलाला काश्मिरमध्ये प्रपोज करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

लीलाच्या डोळ्यात अश्रू…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये लीला व एजे काश्मिरमध्ये आनंद घेताना दिसत आहे. काही ठिकाणी ते बर्फात दिसत आहेत, तर काही ठिकाणी सरोवरात बोटीने प्रवास करताना दिसत आहेत. त्यांनी काश्मिरी पोशाख केल्याचेही पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एजे लीलाला प्रपोज करतो. तो तिला म्हणतो, तुझ्यामुळेच लीला आपल्यासारख्या इम्परफेक्ट जोडीची परफेक्ट लव्हस्टोरी सुरू झाली. आयुष्यात सेकेंड चान्स किती महत्वाचा आहे, हे तू मला सांगितलंस लीला. तुझ्या प्रेमात पार बुडालोय. आय लव्ह यू.” त्याचे हे बोलणे ऐकून लीला भावुक झाल्याचे दिसत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोला झी मराठी वाहिनीने एजे लीलासमोर देणार प्रेमाची कबुली”, अशी कॅप्शन दिली आहे.

याच मालिकेच्या आणखी एका प्रोमोमध्ये पुढील भागात काय होणार हे पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की एजे चहा पित आहे. तर लीला त्याच्या अंगावर बर्फ फेकते. त्यानंतर ते दोघे बर्फात काहीतरी बनवताना दिसत आहे. त्यावेळी एजे तिला म्हणतो, “लीला तुला माहितेय का मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं की तुझं व माझं कधी पाच मिनिटंसुद्धा पटेल. कधी जमेल. तू माझ्या आयुष्यात एका वादळासारखी आलीस आणि कधी माझी मैत्रीण व जोडीदार झालीस, हे मला कळलंही नाही. शेवटी ते सेल्फी काढताना दिसत आहेत.”

दरम्यान, आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.