‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःचं पात्र उत्तमरित्या निभावलं आहे. त्यामुळे आता त्या पात्रावरून कलाकारांना ओळखलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे (अभिराम जहागीरदार) व लीलाच्या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. अभिनेता राकेश बापटने एजे हे पात्र साकारलं असून अभिनेत्री वल्लरी विराज लीला या पात्रात दिसत आहे. तसंच दुर्गा, अंतरा, लक्ष्मी, सरस्वती, सरोजिनी, किशोर जहागीरदार अशी सगळी पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. अशातच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “आपण खरंच इतके दगडाच्या काळजाचे झालोत का?” वसई हत्या प्रकरणाचा व्हिडीओ पाहून अभिनेता संतापला, म्हणाला, “पोलिसांना…”

‘नवरी मिळे हिटलरला’मधील कलाकारांचा हा डान्स व्हिडीओ दुर्गा म्हणजेच अभिनेत्री शर्मिला शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत, मालिकेतील कलाकार गोविंदाच्या ‘अंगना मे बाबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये शर्मिलासह प्रसाद लिमये, रुचिर गुरव, भुमिजा पाटील, अजिंक्य दाते, सानिका काशिकर, आलापिनी अमोल हे कलाकार डान्स करत आहेत.

हेही वाचा – Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांच्या डान्स व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. लीला म्हणजे वल्लरी विराज हा व्हिडीओ पाहून म्हणाली, “वेडसर लोक.” तसंच “लीलाने अख्या जहागीरदार घराण्याला वेडं केलं आहे”, “क्या बात है”, “मस्त”, “सुपर व्हिडीओ”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – “पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?” प्रसिद्ध दिग्दर्शकाची वसई हत्या प्रकरणाबाबत संतापजनक पोस्ट, म्हणाले, “मुर्दाड बघ्यांचं…”

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या टीआरपीबद्दल बोलायचं झालं, तर टॉप-२०मध्ये ही मालिका नेहमी असते. गेल्या आठवड्यात आलेल्या टीआरपी रिपोर्टमध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका १८व्या स्थानावर होती. या मालिकेला २.६ रेटिंग मिळालं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlerla fame actor and actress dance on govinda song angna mein baba pps