मालिकेत दिसणारे कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. गाणी, डान्स, विनोदी रील्स अशा विविध प्रकारचे व्हिडीओ हे कलाकार सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या कलाकृतीबरोबर या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. विशेष बाब म्हणजे प्रेक्षकही कलाकारांच्या या रील्सला पसंती दर्शवताना दिसतात. आता नवरी मिळे हिटलरला मालिकेतील काही कलाकारांनी एकत्र येत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लक्ष्मी, सरस्वती, यश, विराज, प्रमोद यांनी एका गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासह मालिकेतील इतर कलाकार ‘देख तुनी बायको’ या गाजलेल्या अहिराणी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या कलाकारांनी भन्नाट डान्स केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सगळेच कलाकार उत्साहात डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सानिका काशिकरने, “नुसती पाउडर चोपडस”, अशी कॅप्शन दिली आहे. तसेच मिलिंद नंदा, राजदीप, रूचिर यांना टॅग केले आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी कलाकारांचे कौतुक केले आहे. “वाह! खानदेशी गाणे”, “सुंदर”, “कडक”, “फुल धमाल”, “छान”, अशा कमेंट करत चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. या सगळ्यात या मालिकेत दुर्गाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिला शिंदेने कमेंट करित लक्ष वेधले. तिने रूचिरला उद्देशून लिहिले, “मी तुला नाकारल्यापासून तू वेडा झाला आहेस”, त्यावर भूमिजा पाटीलने, “त्याला डॉक्टरकडे घेऊन जा”, असे म्हणत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. रूचिरने या मालिकेत यश ही भूमिका साकारली आहे. जो दुर्गाचा भाऊ आहे. त्याने काही दिवासांपूर्वीच दुर्गाच्या मनाविरूद्ध लीलाच्या बहिणीशी म्हणजेच रेवतीशी लग्न केले आहे. तर अभिनेत्री भूमिजा पाटील सरस्वती या भूमिकेत दिसत आहे. विराज ही भूमिका राजदीपने साकारली आहे. तर मिलिंद नंदाने प्रमोद ही भूमिका साकारली आहे. हे कलाकार डान्सच्या माध्यमातून सतत प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळते.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत राकेश बापट व वल्लरी विराज प्रमुख भूमिकेत दिसत आहे. राकेश बापटने एजे उर्फ अभिराम ही भूमिका साकारली आहे. तर, वल्लरी विराजने लीला ही भूमिका साकारली आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सध्या एजे व लीला काश्मीरला गेल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये लीलावर एका व्यक्तीने गोळी झाडल्याचे पाहायला मिळत आहे. आता एजे तिचा जीव कसा वाचवणार आणि मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.