संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजची चर्चा अजूनही सुरू आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल प्रमुख भूमिकेत झळकल्या आहेत. ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या सीरिजची कथा, सीन्स, गाणी, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांचा चांगलाच भावला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर ‘हीरामंडी’चे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून गाणी ट्रेंड होतं आहेत. या सीरिजमधल्या गाण्यांची भुरळ प्रत्येकालाच पडली आहे. यामध्ये आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला व रेवतीचं नाव सामील झालं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेची लोकप्रिय दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शिवाय या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनेता राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला या जोडीला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना दिसत आहे. अशातच लीला व रेवतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत लीला व रेवतीने (आलापिनी अमोल) ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाण्यावर शास्त्रीय नृत्य केलं आहे.

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’ चित्रपटामधील श्रेया घोषालच्या आवाजातील दुसरं गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष

लीला म्हणजेच वल्लरी विराजने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वल्लरी साडीत दिसत असून आलापिनी सुंदर ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत वल्लरीने लिहिलं आहे, “जेव्हा घरात दोन शास्त्रीय नृत्यांगणा असतात.” वल्लरीने शेअर केलेल्या या व्हिडीओत दोघी ‘हीरामंडी’तील ‘सैयां हटो जाओ’ या गाण्यावर शास्त्रीय नृत्य करताना पाहायला मिळत आहे.

वल्लरी व आलापिनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघींचं कौतुक केलं आहे. “सुंदर डान्स”, “तुम्ही खूप गोड दिसताय”, “कमाल”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – गौरव मोरेने ओंकार भोजने, भाऊ कदमसह ‘या’ कलाकारांची घेतली खास भेट, फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या यामागचं कारण

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अजूनही एजेच्या लग्नाचा तिढा कायम आहे. एजेचं लग्न श्वेताशी ठरलं असलं तरी आई मावशी, किशोर जहागीरदार असे सगळे मिळून एजेचं लग्न फक्त लीलाशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता एजेचं लग्न श्वेताशी होणारी की लीलाशी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader