Navri Mile Hitlerla : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या लीला एजे ( अभिराम जहागीरदार )च्या प्रेमात पडलेली पाहायला मिळत आहे. लवकरच लीला तिचं हे प्रेम एजेसमोर व्यक्त करणार आहे. अशातच जहागीरदार कुटुंब क्रूझवरून फिरायला गेलं आहे. यावेळीच लीला आपल्या मनातील भावना एजेंना सांगणार आहे. पण नेहमीप्रमाणे तिच्या सूना नवी डाव रचणार आहेत. सूनांचा हा नवा डाव लीला हाणून पाडते की त्याचा ती बळी पडते हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. एकाबाजूला मालिकेत ही रंजक गोष्ट सुरू असताना दुसऱ्याबाजूला लीला-रेवतीने आपल्या सुंदर सादरीकरणाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नेहमी त्यांचे मजेशीर डान्स व्हिडीओ व्हायरल होतं असतात. लीला आणि रेवतीच्या म्हणजेच अभिनेत्री वल्लरी लोंढे आणि आलापिनी निसळ यांच्या डान्स व्हिडीओचा आता एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकताच वल्लरीने दोघींचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहून नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.
“तुमचा वेडेपणा कायम जपून ठेवणाऱ्या सर्व रुममेट्सना”, असं कॅप्शन लिहित वल्लरीने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, वल्लरी आणि आलापिनी ‘सिंघम’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या ‘साथिया’ या रोमँटिक गाण्यावर वल्लरी-आलापिनीने नेहमी प्रमाणे खूप सुंदर डान्स केला आहे.
हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म
वल्लरी आणि आलपिनीचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. “खूप छान”, “बेस्ट ऑन-स्क्रीन बहिणी”, “तुम्ही दोघी नेहमी रॉक करतात. तुम्हा दोघींना एकत्र पाहायला खूप आवडतं”, “खूप सुंदर”, “कमाल”, “एक्सप्रेशन क्वीन”, “तुम्ही दोघी सख्ख्या बहिणी वाटता”, “तुमची केमिस्ट्री भारी आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.