‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अजूनही एजेचा लग्नसोहळा सुरू आहे. एजेची लग्नगाठ लीलाशी बांधण्यासाठी किशोर जहागीरदारने एक जबरदस्त प्लॅन रचना आहे. त्या प्लॅननुसार एजे श्वेता ऐवजी लीलाबरोबर सातफेरे घेणार आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच मालिकेतील इतर कलाकारांनी देखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सध्या या मालिकेसह यामधील कलाकार नेहमी चर्चेत असतात.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे व लीलाच्या जोडीला प्रेक्षकांचं जितकं प्रेम मिळत आहे. तितकंच लीला व रेवती या दोघी बहिणींना देखील मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघी बहिणींनी आपल्या डान्स व अदाकारीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी दोघींनी ‘हीरामंडी’तील ‘सैयां हटो जाओ’ या गाण्यावर शास्त्रीय नृत्य केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ दोघींचा चर्चेत आला आहे.

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Navri Mile Hitlarla
“दोघांचं भांडण…”, अनोळखी मन्याच्या ‘त्या’ कृतीमुळे लीला-एजेमध्ये येणार दुरावा? नेटकरी म्हणाले, “ट्विस्ट छान आहेत; पण…”
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा – रोहित शेट्टीबरोबर पंगा घेणं असिम रियाजला पडलं महाग, थेट ‘खतरों के खिलाडी १४’मधून केलं बाहेर, वाचा संपूर्ण प्रकरण

अभिनेत्री वल्लरी विराजने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या व्हिडीओत, लीला व रेवती (आलापिनी अमोल) आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या ‘ये लडका है अल्लाह’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघींचा हा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

हेही वाचा – “अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब…”, अयोध्येतील निकालाबद्दल गायक सोनू निगमची पोस्ट; म्हणाला, “५०० वर्षांनंतर राम मंदिर…”

हेही वाचा – “माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…

लीला व रेवतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप गोड”, “तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर दिसता”, “एक्स्प्रेशन खूप छान आहेत”, “मालिकेतील तुमच्या दोघींचं बॉन्ड खूप आवडतं”, “सर्वोत्कृष्ट बहिणी” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader