Navri Mile Hitlerla Marathi Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका यावर्षी ( २०२४ ) मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी लोंढे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एजे-लीलाची ही हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या देखील अल्पावधीतच पसंतीस उतरली आहे. मालिकेच्या कथानकानुसार यामध्ये लीलाच्या सासूबाईंची भूमिका शर्मिला शिंदे, सानिका काशीकर आणि भूमिजा पाटील या तीन अभिनेत्री साकारत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेत शर्मिलाने दुर्गा जहागीरदार, सानिकाने लक्ष्मी तर, भूमिजाने सरस्वती जहागीरदार या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या तिघी ऑनस्क्रीन एकत्र येऊन नेहमीच लीला विरोधात कारस्थान रचत असल्याचं पाहायला मिळतं. पण, ऑफस्क्रीन सुद्धा या तिघींमध्ये तेवढीच घट्ट मैत्री आहे. शर्मिला, सानिका आणि भूमिजा या तिघींनी मिळून एका मराठी लोकगीतावर नुकताच भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?

‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाच्या सासवांचा भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर अनेक जुनी गाणी, मराठी लोकगीते ट्रेंड होताना दिसतात. सध्या अशाच एका मराठी लोकगीतावर नेटकरी भन्नाट डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. “बघ बघ अगं सखे कसं गुबू गुबू वाजतंय” असे या गाण्याचे बोल आहेत. हे धमाल मराठी लोकगीत गायक जगदीश गोरसे यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यावर हे लोकगीत चित्रित झालेलं आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेतील शर्मिला, सानिका आणि भूमिजा या तिन्ही अभिनेत्रींना देखील या लोकगीताची भुरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे. या तिघींनी ‘कसं गुबू गुबू वाजतंय’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. “Just being बुगू बुगू … सेटवरची मजा” असं कॅप्शन देत सानिकाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “तुझं लग्न झालंय, दोन मुलं आहेत, तू…”; बोनी कपूर यांनी प्रपोज केल्यावर ६ महिने बोलल्या नव्हत्या श्रीदेवी, म्हणाले, “तिचा होकार…”

हेही वाचा : Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “एनर्जेटिक डान्स”, “मस्त डान्स”, “वाह मस्तच”, “एक नंबर डान्स”, “तुम्ही तिघीपण वाइल्डफायर आहात” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर दररोज रात्री १० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेने यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात सुद्धा बाजी मारली होती.