‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत अढळ स्थान निर्माण केलं आहे. एजे (अभिराम), लीला, अंतरा, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, कालिंदी, रेवती, विक्रांत ही पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. मालिकेतील एजे व लीलाच्या जोडीची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. तसंच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडताना दिसत आहेत. अशातच मालिकेतील एका कलाकाराने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्याचं समोर आलं आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मलिकेतील हा कलाकार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन काहीतरी सुरू करणार असल्याचं सांगत होता. अखेर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या कलाकाराने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून किशोर जहागीरदार म्हणजे अभिनेता प्रसाद लिमये आहे.
हेही वाचा – “अप्सरा हो…”, ज्युनियर एनटीआरबरोबर जान्हवी कपूरचा जबरदस्त डान्स पाहून बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणाला…
अभिनेता प्रसाद लिमये आता अभिनयाचं काम सांभाळत व्यवसाय देखील करणार आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रसादने हॉटेल व्यवसाय पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. ‘अन्नपूर्णा’ असं प्रसादच्या हॉटेलचं नाव आहे. नुकताच एक व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
हेही वाचा – “कुठेतरी फेक वाटतंय”, निक्कीबरोबर असलेल्या रिलेशनशिपवर अरबाज पटेलच्या वडिलांचं भाष्य, म्हणाले…
अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “गणपती बाप्पा मोरया…अन्नपुर्णा प्रसन्न…अन्न हे पुर्णब्रह्म… जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि तोच आनंद द्विगुणीत करायला आम्ही घेऊन येत आहोत खास ठाणेकरांसाठी ‘अन्नपुर्णा’ची मेजवानी. ‘अन्नपुर्णा’ क्लाऊड किचन आणि कॅटरिंग सर्व्हिसेस आहे.”
आनंदाची बातमी देत प्रसाद काय म्हणाला?
हेही वाचा – Bigg Boss Marathi : ‘ए’ टीममध्ये फूट पडल्यामुळे अरबाज पटेलचे वडील चिंतेत, म्हणाले, “वैभव आणि जान्हवीबरोबर…”
दरम्यान, अभिनेता प्रसाद लिमयेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पुढचं पाऊल’नंतर तो बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकला. ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत तो पाहायला मिळाला. तसंच ‘बेधडक’, ‘What’s up लग्न’, ‘मोगरा फुलला’, ‘फतेशिकस्त’ या चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. ‘फतेशिकस्त’ चित्रपटात प्रसादने बाळाजी देशपांडेंची भूमिका साकारली होती.