‘झी मराठी’ वाहिनीवरील सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. राकेशने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. तसंच मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या चांगलंच खिळवून ठेवलं आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर लीला-एजेचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. हे कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सेटवरील डान्स व्हिडीओ, मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. अलीकडेच वल्लरी विराजने सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता; जो सध्या खूप चर्चेत आला आहे.
अभिनेत्री वल्लरी विराजने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर अनेक चाट पदार्थ पाहायला मिळत आहेत. पाणीपुरी, वडा, समोसा, ढोकळा, वेफर्स, जिलबी असे पदार्थ दिसत आहेत. यावेळी लीला-एजे म्हणजेच वल्लरी विराज आणि राकेश बापट पाणीपुरीवर ताव मारताना पाहायला मिळत आहेत. दोघांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत काय सुरू आहे?
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जहागीरदारांच्या घरी धमाल रंगली आहे. विशेष म्हणजे एजेने लीलाच्या घरी जाऊन तिच्यासाठी स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नव्हे तर एजे स्वतःच्या हाताने हलवण्याचे दागिने लीलाला घालतो. एजेचं हे वागणं पाहून लीला भारावून जाते. एजेचं प्रेम तिला कळतं असतं. पण, एजे स्वतःहून लीलावरचं प्रेम कबुल करत नाही. त्यामुळे एजे कधी लीलासमोर प्रेम व्यक्त करतो? या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd