‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. जशी लीला व एजेची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. तसेच किशोर व दुर्गाचे लीला व एजेला त्रास देण्यासाठीच्या योजना याबरोबरच सरू हे विनोदी पात्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. एजे व लीलाला त्रास देण्यासाठी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती नेहमी काही ना काही करत असल्याचे दिसतात.

नवरी मिळे हिटलरला मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लीलाचा अपमान करण्यासाठी, तिला वाईट वाटावे म्हणून दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांनी लीलाने काम केलेली जाहीरात सर्वांसमोर लावली. ज्यामध्ये ती अगदी कमी स्क्रीनवर दिसली. हे पाहिल्यानंतर या सुनांनी सर्वांसमोर तिचा अपमान केला, खिल्ली उडवली. त्यानंतर लीलाला वाईट वाटले. एजेने सुनांनी केलेली कृती ही अत्यंत चुकीची असल्याचे म्हणत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे सुनावले. तसेच ही शिक्षा लीलाने द्यावी, असेही त्याने स्पष्ट केले. लीलाने दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना टायगर या त्यांच्या श्वानाच्या मागे पळावं, अशी शिक्षा दिली होती. आता या सीनच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ अभिनेत्री सानिका काशिकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नवरी मिळे हिटलरला मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिका काशिकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लीला व तिच्या तिन्ही सूना दिसत आहेत. लीलाने शिट्टी वाजवल्यानंतर या तिन्ही सुना वार्म अप करताना दिसत आहेत. हे वार्म अप करताना दुर्गा लक्ष्मी व सरस्वती मजा करीत असल्याचे त्यांच्या कृतीमधून दिसत आहे. या व्हिडीओवर ‘लीलाच्या तालावर सुना नाचताना’ असे लिहिले आहे. सानिकाने हा व्हिडीओ शेअर करताना शर्मिला शिंदे, वल्लरी विराज व भूमिजा पाटील यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटलादेखील टॅग केले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

सानिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कौतुकही केले आहे. “तुम्ही सगळ्या कमाल आहात”, “एकदम मस्त. तुम्ही चौघीही खूप छान दिसताय एकत्र मस्ती-मज्जा करताना”, “भारी, एक नंबर वार्म अप आहे”, असे म्हणत नेटकऱ्यांनी या चौघींचे कौतुक केले आहे.

लीला व एजेची जोडी लोकप्रिय ठरली आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच एजेने लीला प्रपोज केल्याचे पाहायला मिळाले. तसेच तो तिला तिच्या सुख-दु:खात साथ देतो, तिला सांभाळून घेतो. तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तिला मदत करतो. आता नुकत्याच एका प्रोमोमध्ये एजेची पहिली पत्नी परत आल्याचे पाहायला मिळाले होते. आता या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.