‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla)मालिकेत सध्या एजे व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. एजे-लीलमध्ये दिसत असलेले एकमेकांविषयी प्रेम प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एजेने लीलावरचे प्रेम व्यक्त करावे, अशी प्रेक्षकांची इच्छा होती. लीला अनेकदा एजेने तिला प्रपोज केले आहे, अशी स्वप्ने बघत होती. एजेनेदेखील अनेकदा त्याचे लीलावर प्रेम असल्याचे त्याच्या कृतीतून व्यक्त केले होते. मात्र, एजेने तिला स्वत: सांगावे, त्याच्या मनातील भावना व्यक्त कराव्यात, असे लीलाला वाटत असे. आता लीलाचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. नवरी मिळे हिटलरला मालिकेत ट्विस्ट आला असून एजे लीलाला काश्मिरला घेऊन गेल्याचे पाहायला मिळत आहे. आता या सगळ्यात अभिनेत्री वल्लरी विराज(Vallari Viraj)ची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
वल्लरी विराजने शेअर केले काश्मिरमधील फोटो
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत वल्लरी विराजने लीलाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता राकेश बापटने एजे उर्फ अभिरामची भूमिका साकारली आहे. वल्लरीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती लाल साडीमध्ये दिसत आहे. तिच्या आजूबाजूला सगळीकडे बर्फ असल्याचे दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल आहेत. हे फोटो शेअर करताना वल्लरी लिहिले, “मी माझे बॉलीवूडचे स्वप्न जगत आहे.” तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
नवरी मिळे हिटलरलामधील रेवती म्हणजेच अभिनेत्री आलापिनीने वल्लरीच्या फोटोंवर कमेंट करीत, “काश्मिर की कली”, असे लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेनेदेखील इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केल्याचे दिसत आहे. अनेक चाहत्यांनी वल्लरीच्या या फोटोंवर कमेंट करीत हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर अनेकांनी “सुंदर”, असे लिहित अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री वल्लरी विराजने मालिकेत लीला ही भूमिका साकारली असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसते. लीलाचा अल्लडपणा, गोंधळ घालून ठेवण्याची सवय, सर्वांशी प्रेमाने वागत जगण्याचे कसब तसेच वाईट वागणाऱ्यांना धडा शिकवणारी, लीला सर्वांना आवडते. दुसरीकडे याउलट एजेचा स्वभाव असल्याचे दिसते. कडक शिस्तीचा एजे, वेळच्या वेळी गोष्टी व्हाव्यात यासाठी अट्टाहास धरणारा एजेदेखील प्रेक्षकांचा लाडका आहे. मालिकेतील इतर किशोर, दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती, आजी अशी सगळीच पात्रे वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता मालिकेत पुढे काय होणार, किशोर लीला व एजेला वेगळे करण्यासाठी काय कऱणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.