Zee Marathi Navari Mile Hitlerla Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरची ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका लवकरच ऑफ एअर म्हणजेच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत. या बातमीमुळे ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका काहीही झालं तरी बंद करायची नाही अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे सगळ्या चाहत्यांनी एकजूट करून ‘Don’t End NMH’ हा हॅशटॅग एक्स वर ( आधीचं ट्विटर ) ट्रेंड केला होता. याशिवाय या मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या महाएपिसोडच्या प्रोमोवर सुद्धा नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत ‘झी मराठी’ वाहिनीला टॅग करून विनंती केली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत लवकरच लीला आणि अंतरा समोरासमोर येणार आहेत. एजेची पहिली पत्नी अंतरा अचानक समोर आल्याने लीलाला खूप मोठा धक्का बसणार आहे. अंतराच्या डोक्याला दुखापत झाल्याने लीला तिला रुग्णालयात दाखल करते. यावेळी अंतरा तिची ओळख डॉक्टरांना सांगते. यानंतर डॉक्टर तिच्याकडे कुटुंबीयांबद्दल चौकशी करत असल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्या गोष्टी पाहून लीला प्रचंड अस्वस्थ होते. आता एजेची पहिली बायको मालिकेत आल्यावर एजे-लीलाच्या आयुष्यावर याचा निश्चितच परिणाम होणार आहे. पण, हा सगळा किशोरचा डाव असतो.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा हा विशेष महाएपिसोड भाग २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता प्रसारित केला जाणार आहे. मात्र, प्रेक्षकांनी या प्रोमोवर, “प्लीज काहीही करून ही मालिका बंद करू नका” अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

“NMH बंद करू नका”, “प्लीज हा शो संपवू नका…. आम्ही प्रत्येक भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक असतो”, “हा बेस्ट शो आहे…प्लीज झी मराठी हा शो बंद करू नका” अशा असंख्य कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

Zee Marathi Navari Mile Hitlerla Serial
‘झी मराठी’च्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Zee Marathi Navari Mile Hitlerla Serial )

दरम्यान, आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेबद्दल काय निर्णय होणार? नवीन मालिका सुरू झाल्यावर एजे-लीला खरंच प्रेक्षकांचा निरोप घेणार का? या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील.