Navri Mile Hitlerla Upcoming Episode : अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतल्या नवनवीन ट्विस्टचं प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. राकेश बापटने साकारलेला एजे (अभिराम) व वल्लरीने साकारलेली लीला ही जोडी आता घराघरात पोहोचली आहे. लवकरच या जोडीत प्रेमाचा रंग बहरताना पाहायला मिळणार आहे.

नुकताच ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दहीहंडी विशेषच्या भागात काय घडणार? हे दाखवण्यात आलं आहे. यात लीला एजेच्या नकळत आजीची परवानगी घेऊन दहीहंडी खेळायला गेलेली पाहायला मिळत आहे. पण ज्या ठिकाणी लीला दहीहंडी फोडायला जाते तिथेच एजेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं असतं. याची लीलाला अजिबात कल्पना नसते. लीला एजेला न सांगता दडीहंडीसाठी गेलेली असते. त्यामुळे लीलाला हंडी फोडताना पाहून एजेला धक्काच बसतो.

हेही वाचा – Video: आजपासून सुरू होणार तुळजाचा लग्नसोहळा, सूर्याने दिलं आमंत्रण; पण तुळजा कोणाशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थ की सत्यजितशी?

हेही वाचा – Video: “गोविंदा रे गोपाळा…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

दहीहंडी खेळण्यामागचं लीलाचं सत्य समजताच एजे काय करतो?

लीलाने एजेचे पैसे फेडण्यासाठी दहीहंडी खेळायचं ठरवलं असतं. ज्या ठिकाणी ती जाते तिथे हंडी फोडण्यासाठी मोठं बक्षिसं असतं. पण हंडी फोडताना लीलाला पाहून एजे काळजीपोटी तिच्यावर खूप रागवतो. पण हे तिने का केलं आहे? हे कळताच तो लीलाच्या घरी जाऊन साळुंखेचं कर्ज फेडतो. एजे तिची आणि तिच्या माहेरच्या माणसांची इतकी काळजी करतो आहे हे पाहून लीलाच्या मनात एजेविषयी भावना जाग्या होतात. इथून पुढे खऱ्याअर्थाने एजे-लीलामध्ये प्रेमाच्या नात्याची सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – “सच्चा माणूस…”, ‘बिग बॉस मराठी’ विजेता अक्षय केळकरकडून सुरज चव्हाणवर स्तुतीसुमने, म्हणाला, “तो शांत दिसतो पण…”

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या टीआरपीबद्दल बोलायचं झालं तर, सुरू झाल्यापासून एजे-लीलाची मालिका टॉप-२०मध्ये ठाण मांडून आहे. काही आठवड्यांमध्ये या मालिकेने ‘स्टार प्रवाह’च्या काही मालिकांही मागे टाकलं आहे. गेल्या आठवड्याच्या टीआरपीनुसार, ‘नवरी मिळे हिटलरला’ १९व्या स्थानावर असून २.९ रेटिंग मिळालं आहे. ‘स्टार प्रवाह’ची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेपेक्षा जास्त टीआरपी ‘झी मराठी’च्या या मालिकेला मिळताना दिसत आहे.

Story img Loader