Navri Mile Hitlerla Upcoming Episode : आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी दहीहंडी शिबीर सुरू आहे. मराठी मालिकांमध्येही दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेतील दहीहंडी उत्सवाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेता राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच मालिकेतील इतर कलाकारांनी देखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे मालिकेत सतत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टचं प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहेत. आता लवकरच मालिकेत दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे. लीला दहीहंडी फोडताना दिसणार आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेतील दहीहंडी उत्सवाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेच्या सोशल मीडियावरील पेजवर दहीहंडी उत्सवाचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये लीला दहीहंडी फोडताना दिसत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला लीला व अभिरामाचा रोमँटिक क्षण देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत दहीहंडी उत्सवा दरम्यान नेमकं काय घडणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
हेही वाचा – घटस्फोटाने नाही तर ‘असा’ झाला ‘अंतरपाट’ मालिकेचा शेवट, टीआरपीअभावी ७६ भागांतच संपवली मालिका
सध्या मालिकेत काय सुरू आहे?
‘नवरी मिळे हिटलरला’ ( Navri Mile Hitlerla ) मालिकेत सध्या लीलाचं हिटलर एजेबद्दलचं मत हळूहळू बदलताना दिसत आहे. एजेची दुसरी बाजू आता समोर येत आहे. त्यामुळे दोघांचं नातं अजून खुलताना पाहायला मिळत आहे. लवकरच लीला एजेच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करताना दिसणार आहे. यावेळी एजे लीलाला कसा हातभार लावतो? तिची कशी काळजी घेतो? हे पाहायला मिळणार आहे.