गोविंदाची भाची व टीव्ही अभिनेत्री सौम्या सेठ सध्या अभिनयापासून दूर आहे. अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि अमेरिकेत स्थायिक झाली होती. आता सौम्याने तिच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सौम्या दुसऱ्यांदा आई होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी दुसरं लग्न करणारी सौम्या आता पुन्हा गरोदर आहे. सौम्याला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.

‘नव्या’ या शोमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सौम्या आता इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या वैयक्तिक व व्यायवसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सौम्या काही वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेला गेली होती आणि ती आपला मुलगा व पतीसोबत अमेरिकेत राहते.

आता सौम्याने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सौम्या आई होणार आहे. सौम्या व तिचा पती जुलै महिन्यात त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. अभिनेत्रीने अडीच वर्षांपूर्वी शुभम चुहाडियाशी लग्न केलं होतं.

सौम्या सेठची पोस्ट –

दोन वर्षांत मोडलं पहिलं लग्न

सौम्याने २०१५ मध्ये अरुण कुमारशी अमेरिकेत लग्न केलं होतं. पण तिला कौटुंबिक हिंसाचार व मानसिक त्रास सहन करावा लागला. २०१७ मध्ये गरोदर असतानाच तिने घटस्फोट घेतला. आयुष्यात घडलेल्या या घटनांमुळे सौम्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण तिला तिच्या आई-वडिलांनी सांभाळलं आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत केली. सौम्याने जून २०२३ मध्ये शुभम चुहाडियाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. आता सौम्या व शुभम आई-बाबा होणार आहेत.

अडीच वर्षापूर्वी केलं दुसरं लग्न

सौम्याचा पती शुभम हा चित्तोडगडचा रहिवासी आहे. तो आर्किटेक्ट आणि डिझायनर असून अमेरिकेत राहतो. करोना काळात त्यांची भेट आली व ते एकमेकांच्या जवळ आले. दोघांनी जवळपास ३-४ वर्षे डेट केल्यावर लग्नगाठ बांधली. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास सौम्याने स्वतःचा रिअल इस्टेट बिझनेस सुरू केला आहे.