झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली. या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी सहभागी झाली आहेत. नुकतंच प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता निलेश साबळे याने छगन भुजबळ यांना विविध प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी राजकीय विषयांसह अनेक कौटुंबिक विषयांवरही मोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी छगन भुजबळ यांना तुमचे लव्ह मॅरेज झाले आहे की अरेंज मॅरेज असा प्रश्न विचारला आहे. त्यावर त्यांनी फार मजेशीररित्या उत्तर दिले.
आणखी वाचा : “जॉनी लिवर बोलतोय……” ‘चला हवा येऊ द्या’ मधील विनोदवीराला मेसेज
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, “आधी लव्ह मॅरेजनंतर ते अरेंज मॅरेज झाले. छगन भुजबळ यांची मोठ्या बहिणीचे लग्न त्यांची पत्नी मीना भुजबळ यांच्या भावाबरोबर झाले आहे. त्यामुळे माझं यांच्या घरी येणं-जाणं सतत सुरु असायचं. त्यावेळी या माझ्या मागे लागल्या. त्यावर पत्नी मीना भुजबळ यांनी नाही असे म्हटले. छगन भुजबळ यांनी मग मी त्यांच्या मागे लागलो असं म्हणा. मला इथून घरी जायचं परत.. त्यांना बरं वाटलं पाहिजे नाही. त्यानंतर ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो.”
आणखी वाचा : “यांना कामधंदे नाहीत का?” अंथरुणाला खिळून असलेल्या वृत्तांवर वर्षा दांदळेंनी व्यक्त केला संताप
दरम्यान छगन भुजबळांचा हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या प्रोमो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.