छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सुरू होत आहे. २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’चं नव पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिले तीनही पर्व हिट ठरल्यानंतर चौथ्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या पर्वाचे सूत्रसंचालनही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची पत्रकार परिषद पार पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश मांजरेकरांना या पत्रकार परिषदेत ‘बिग बॉस’च्या घरात कोणत्या राजकीय नेत्याला पाहायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी काही नेत्यांची नावे घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांचंही नाव मांजरेकरांनी घेतलं होतं. याबाबत मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> Big Boss Marathi : “अशी सोन्यासारखी संधी…”, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबाबत गुलाबराव पाटलांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

अमोल मिटकरी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील फार मोठे अभिनेते आणि दिग्दर्शक आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांनी माझ्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मलाही त्यांच्या हाताखाली काम करायला आवडेल. माझ्यासारख्या सामान्य घरातील व्यक्तीचं नाव घेणं, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याची संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. ‘बिग बॉस’च्या घरात जायला मला नक्कीच आवडेल”.

हेही वाचा >> “नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

महेश मांजरेकरांनी अमोल मिटकरींसह आणखी काही नेत्यांची नावे घेतली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव महेश मांजरेकरांनी घेतलं होतं.  ‘बिग बॉस’च्या घरात येण्यासाठी व्यक्तिमत्वात एक वेगळेपण असावं लागतं, ते संजय राऊत यांच्यामध्ये आहे, असं ते म्हणाले होते. याबरोबरच भाजपा आमदार नितेश राणे आणि शिंदे गटातील शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनाही पाहायला आवडेल असं मांजरेकर म्हणाले होते.  

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla amol mitkari reaction on mahesh manjarekar bigg boss marathi 4 kak