मराठी मालिकांच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येतात आणि अल्पावधीत ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग होऊन जातात. पण काही वर्षांपूर्वी मालिकांमध्ये काम करून नाव कमावलेल्या अनेक अभिनेत्री आज मनोरंजनसृष्टीपासून दूर राहत आपापल्या संसाराला लागल्या आहेत. आता नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती आता शिक्षिका झाल्याचे सांगितले आहे.

काही वर्षांपूर्वी​ ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतून आपल्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. या मालिकेत नेहा प्रमुख भूमिकेत झळकली होती. त्यांनतर ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकेत आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटातही तिने काम केलं. तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच या चित्रपटानंतर नेहाने ईशान​​ बापटशी लग्नागाठ बांधली. मार्च २०१९ मध्ये ती विवाहबद्ध झाली.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
loksatta lokankika competition
लोकसत्ता लोकांकिका : विभागीय अंतिम फेरीसाठी सहा संघांची निवड, आपल्या भागातील विषय मांडणीला प्राधान्य
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर

आणखी वाचा : “१०६ वर्षांची पेशवाई फक्त…”; शरद पोंक्षेंचं बाजीराव पेशवेंबद्दलचं वक्तव्य चर्चेत

लग्नानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला आणि ती तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. आता एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवत आहे. नेहाने ऑस्ट्रेलियातून ‘डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ ही पदवी मिळवली आहे. ही बातमी तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली.

तिने लिहिले, “दोन वर्ष मेहनत घेतल्यानंतर मला ‘डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ ही पदवी मिळाली आहे आणि याचा मला आनंद आहे. जवळपास एक दशक मी अभिनेत्री म्हणून काम केलं त्यानंतर वेगळ्या देशात येऊन नवीन कॅरियर सुरू करणं ही सोपी गोष्ट नव्हती. माझ्यासाठी ही एक रोलर कोस्टर राईड आहे. परंतु मी जिथे पोहोचले त्याचा मला अभिमान आहे. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या माझ्या आई आणि बाबांचे आभार.”

हेही वाचा : ‘मन उधाण वाऱ्याचे’ फेम नेहा गद्रे अडकली विवाहबंधनात, पहा फोटो

माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आहे. पण तुमच्या माझ्यावरील याच विश्वासाने मला पुन्हा खंबीर केले. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करते. मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या भावाला आणि माझ्या नवऱ्याला कशी विसरेल. या सर्वांसाठी तुमचे मनापासून आभार!”

दहा वर्षाच्या अभिनय क्षेत्राच्या कारकीर्दीनंतर नेहा आता शिक्षिकेची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असून यावर कमेंट्स करत तिला तिच्या मनोरंजन क्षेत्रातील मित्र मंडळींनी आणि तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader