Neha Gadre Pregnancy Good News : लग्नानंतर अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्री, करिअर सोडून संसाराची वाट धरल्याचं आपण पाहिलं आहे. बॉलीवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंतच्या अनेक अभिनेत्री लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. मराठी कलाविश्वातील अशाच एका अभिनेत्रीने काही वर्षांआधी अभिनय क्षेत्र सोडून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीचं नाव आहे नेहा गद्रे.

‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमुळे आणि ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे नेहाला एक वेगळी ओळख मिळाली होती. परंतु, सध्या ती अभिनयापासून दूर आहे. वैयक्तिक आयुष्यात २ मार्च २०१९ मध्ये तिने ईशान बापटशी विवाह केला. सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियात राहतात. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह फोटो शूट करत नेहाने आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली.

rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Marathi Actress tejaswini pandit sister Poornima Pullan gave birth to a baby girl
“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”

हेही वाचा : प्रथमेश परबने दिव्यांग मुलांसह साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी! त्याच्या पत्नीने लिहिली सुंदर पोस्ट; सर्वत्र होतंय कौतुक

आता नेहाने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये नेहा व तिचा पती बाळाच्या जन्माआधी जेंडर रिव्हिल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे भारतात बेकायदेशीर आहे पण, विदेशात याला परवानगी आहे. त्यामुळे नेहाला आधीच तिला मुलगा होणार की मुलगी हे समजलं आहे.

“व्हील्स ( मुलगा ) की हिल्स ( मुलगी )? बेबी बापट कोण असेल? तुम्हा सगळ्यांसमोर रिव्हिल करण्याची हीच योग्य वेळ आहे.” असं कॅप्शन देत नेहाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेहा तिच्या डोहाळे जेवणासाठी एकदम राजकुमारीसारखी तयार झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाचा सुंदर असा गाऊन, डोक्यावर तिआरा घालून ही अभिनेत्री तयार झाली होती.

नेहाने ( Neha Gadre ) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेवटी निळ्या रंगाची वाफ सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळालं. यावरून अभिनेत्रीला मुलगा होणार हे स्पष्ट झालं आहे. कारण, मुलगी होणार असेल तर गुलाबी रंग आणि मुलांसाठी जेंडर रिव्हिल करताना निळ्या रंगाचा वापर केला जातो.

हेही वाचा : ‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…

Neha Gadre
नेहाने बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल ( Neha Gadre )

दरम्यान, नेहाच्या ( Neha Gadre ) या गोड व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता अभिनेत्रीला बाळ केव्हा होणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader