‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री नेहा मर्दा तिच्या प्रेग्नंन्सीमुळे चर्चेत होती. गर्भावस्थेतील काही गुंतागुंतींमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या नेहा मर्दाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने प्रीमॅच्युअर मुलीला जन्म दिला आहे. सध्या तिला व तिच्या नवजात मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. नेहाने तिला झालेला त्रास आणि मुलीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
नेहा मर्दाला आठवडाभरापूर्वी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिची प्रकृती चांगली असून तिने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे. नेहा मर्दाने ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गरोदरपणात येणाऱ्या समस्यांबद्दल सांगितले. नेहा मर्दा आणि तिची मुलगी अजूनही रुग्णालयात आहेत. नेहा म्हणाली, “मी गरोदर राहिल्यापासून मला रक्तदाबाचा त्रास होत होता. पाचव्या महिन्यात त्रास वाढला. आमच्या डॉक्टरांनी आधीच आम्हाला याबद्दल सावध केले होते. तसेच गुंतागुंत होईल, याची कल्पनाही होती, पण सुदैवाने सर्वकाही सुरळीत झाले. मला खूप आनंद आहे की हा टप्पा संपला आहे आणि आम्ही एका सुंदर मुलीचे पालक झालो आहोत. मी आणि बाळ दोघीही ठीक आहोत.”
या आठवड्याच्या अखेरीस नेहा व तिच्या मुलीला डिस्चार्ज मिळेल. नेहाने मुलीला अद्याप हातात घेतलेलं नाही, तसंच ती तिला नीट पाहू शकलेली नाही. जन्मानंतर बाळ काही काळ त्यांच्याजवळ राहिले, पण नंतर तिला एनआयसीयूमध्ये घेऊन गेले. तिचे वजन खूप कमी आहे, असं नेहा म्हणाली. तसेच नेहाच्या लेकीचं नाव तिची आत्या ठेवेल, कारण त्यांच्या कुटुंबात ती प्रथा आहे. दरम्यान, नेहा मर्दाने २०१२ मध्ये आयुष्मान अग्रवालशी लग्न केले होते आणि आता ११ वर्षांनंतर ते दोघेही एका गोंडस मुलीचे पालक बनले आहेत.