‘कलर्स मराठी’वरील ‘ढोलकीच्या तालावर’चा महाअंतिम सोहळा काल मोठ्या दिमाखात पार अन् अखेर महाराष्ट्राला नवी लावणी सम्राज्ञी मिळाली. मनमोहक अदाकारीनं अन् जबरदस्त नृत्य कौशल्याने घायळा करणारी पेणची नेहा पाटील ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती ठरली. तर शुभम बोराडे प्रथम उपविजेता ठरला आणि नम्रता सांगुळे ही द्वितीय उपविजेती ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लावणी नृत्यांगनांनी यंदाच ‘ढोलकीच्या तालावर’चं पर्व चांगलं गाजवलं. फक्कड लावणी, दिलखेचक अदा, पुणेरी ठसका असं सर्व काही यंदाच्या पर्वात पाहायला मिळालं. महाअंतिम फेरीपर्यंत समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर, तनुजा शिंदे, शुभम बोराडे आणि नेहा पाटील या लावण्यावंती पोहोचल्या. पण या सहा लावण्यावंती मधून कोकण कन्या नेहा पाटीलने बाजी मारली. ती यंदाच्या ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती ठरली.

हेही वाचा – “…म्हणून माझा भाऊ मला म्हणतो घंटागाडी”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितली टोपण नावाची यादी

नेहा पाटीलचा या स्पर्धेतला प्रवास लक्षात राहण्यासारखा होता. तिची निष्ठा, तिचं कौशल्य, लावणीतंत्रावर असलेलं प्रभुत्व यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ती सगळ्यांपेक्षा वेगळी ठरत होती. प्रत्येक परफॉर्मन्स तिच्या परिपूर्णतेचं उदाहरण होतो. तसंच परीक्षक आणि प्रेक्षकांना अचंबित करणारा होता. पारंपरिक लावणीचा गाभा जपत तिनं त्याला आधुनिकतेचा तडका देत, कितीतरी मन जिंकली अन् अखेर ती लावणी सम्राज्ञी ठरली.

हेही वाचा – Sindhutai Maazi Maai: लवकरच मोठी चिंधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?; ‘ही’ अभिनेत्री सिंधुताईंच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

यंदाच्या ‘ढोलकीच्या तालावर’ची परीक्षणाची जबाबदारी अभिनेत्री क्रांती रेडकर, सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अभिजित पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी सांभाळली. तर सूत्रसंचालन ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता अभिनेता अक्षय केळकरनं केले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha patil winner of dholkichya talavar and shubham borade becomes the first runner up pps
Show comments