‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेपाठोपाठ आणखी एका नव्या मालिकेची घोषणा झाली आहे. ‘साधी माणसं’ असं या नव्या मालिकेचं नाव असून काल, १२ फेब्रवारीला या मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. मालिका जरी नवी असली तरी त्यामधील प्रमुख चेहरे हे प्रेक्षकांसाठी जुने आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘साधी माणसं’ या मालिकेत ‘लागीर झालं जी’ मालिकेतील शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर व ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे पाहायला मिळणार आहे. शिवानी मीरा तर आकाश सत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. मीरा ही फुलविक्रेती आहे, तर सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: चार महिन्यांनंतर राहुल वैद्य व दिशा परमारने दाखवली लेकीची पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “बाबाची कार्बन कॉपी…”

या नव्या मालिकेच्या पहिल्या-वहिल्या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेच्या जबरदस्त प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘कलाकार जुने आहेत पण काही बोला प्रोमो मात्र लय जबरदस्त आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे.’ तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, ‘खतरनाक.’ तसेच अनेक नेटकऱ्यांनी शिवानी व आकाशला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील आकाशची दाखवलेली पत्नी अंजली म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा – रिंकू राजगुरु सुबोध भावेसह झळकणार नव्या चित्रपटात, जोडीला असणार प्रार्थना बेहेरे, फोटो आले समोर

दरम्यान, आता शिवानी व आकाशची ‘साधी माणसं’ ही नवी मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? ‘स्टार प्रवाह’च्या कोणत्या जुन्या मालिकेची जागा घेणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या काळात मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizen reation on shivani baokar akash nalawade new serial sadhi mansa first promo pps