Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सावळ्याची जणू सावळी’ असं नव्या मालिकेचं नाव असून महेश कोठारे व आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते आहेत. नुकताच मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आहे. पण प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आहेत.

‘झी मराठी’वरील आगामी नवी मालिका ( Zee Marathi New Serial ) ‘सावळ्याची जणू सावली’चा नवा प्रोमो ९ ऑगस्टला प्रदर्शित झाला. ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला होता. काखेत हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी नदीवर आलेल्या एका मुलीच्या एन्ट्रीने प्रोमोची सुरुवात होत आहे. एक महिला मुलीला पाहून म्हणते की, आली आमच्या पांडुरंगाची सावली. त्यानंतर ती सावळीशी मुलगी नदीतून पाण्याने हंडा भरते आणि भरलेला हंडा घेऊन गात जाताना दिसत आहे. यावेळी नदीवर कपडे धुवायला आलेल्या महिला तिचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. तिच्या गोड आवाजाने गावातले सर्वजण मंत्रमुग्ध होताना दिसत आहेत. पण यावेळी एक आजोबा म्हणतात की, एवढा गोड आवाज आहे. एवढी दिसलाय पण गोड असती तर. त्यानंतर केसात गजरा माळलेली ती सावळीशी मुलगी पांडुरंगाची भक्ती भावाने पूजा करताना पाहायला मिळत आहे. याच सावलीचे सूर सौंदर्याची व्याख्या बदलणार का? हे ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत ( Zee Marathi New Serial ) पाहायला मिळणार आहे.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

हेही वाचा – Video: खुशबू तावडे व संग्राम साळवीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, ‘या’ महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार

पण नव्या मालिकेतील सावळी मुलगी प्रेक्षकांना खटकली आहे. “वर्णद्वेष करत” असल्याचं म्हणतं आहेत. तसंच एखाद्या सावळ्या अभिनेत्रीला का घेतलं नाही? असा सवाल केला जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मराठीमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत. तरी गोऱ्या रंगाची अभिनेत्री का?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे गोऱ्याना काळ करून का दाखवतात?” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्हाला काळ्या रंगाचे लोक टीआरपीसाठी स्वीकार होतं नाहीत का?” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “वर्णद्वेष बंद करा.”

हेही वाचा – विजय कदम आणि पल्लवी जोशी यांच्यातील खास नातं तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…

हेही वाचा – विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…”

नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर झळकणार आहे. याआधी ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ मालिकेत प्राप्तीने काम केलं होतं. या मालिकेतील तिची अंजली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यानंतर आता या नव्या मालिकेतून प्राप्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. ‘झी मराठी’ची ही नवी मालिका ( Zee Marathi New Serial ) कधीपासून सुरू होणार? हे अद्याप जाहीर झालेलं नाही.

Story img Loader