मराठी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांना ओळखलं जातं. गेली अनेक वर्षे विविध नाटक, चित्रपट व मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या हे दोघेही छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. याशिवाय ऐश्वर्या आणि अविनाश यांचे इन्स्टाग्राम व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष चर्चेत येतात. त्यांच्या डान्सने प्रत्येकाला भुरळ घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या व अविनाश नारकर सोशल मीडियावर ट्रेडिंग गाण्यांवर रील्स बनवून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. या दोघांच्या भन्नाट डान्सचं सर्वत्र कौतुक केलं जातं. परंतु, काही नेटकरी त्यांना अनेकदा नकारात्मक कमेंट्स करून ट्रोल करतात. अशा सगळ्या ट्रोलर्सला ऐश्वर्या नारकर स्पष्ट उत्तर देत असल्याचं आपण नेहमीच पाहिलंय. परंतु, त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्याने ट्रोल न करता अभिनेत्रीची चक्क माफी मागितली आहे.

हेही वाचा : पूजा सावंतने ऑस्ट्रेलियाच्या घरी नेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा! म्हणाली, “लग्नापूर्वी माझी ही इच्छा…”

ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या व्हिडीओवर ट्रोलिंगची कमेंट करणाऱ्या एका नेटकऱ्याने चक्क या दोघांची माफी मागितली आहे. याची खास पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र दिन : पारंपरिक साज, मुंबई दर्शन अन्…; मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत! सर्वत्र होतंय कौतुक

“ऐश्वर्या नारकर या आधी तुमच्या रीलवर केलेली माझी कमेंट व त्यातली भाषा निश्चित चुकीची असल्याने मी कमेंट डिलीट करून दिलगिरी व्यक्त करतो” असं या संबंधित नेटकऱ्याने म्हटलं आहे. ऐश्वर्या नारकरांनी या कमेंटची स्टोरी शेअर करत संबंधित युजरचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : ‘रमा-राघव’च्या सुखी संसारात नवीन विघ्न! ‘अग्गबाई सुनबाई’ फेम अभिनेत्याची मालिकेत होणार एन्ट्री, पाहा नवीन प्रोमो

ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. यात त्या रुपाली नावाचं नकारात्मक पात्र साकारत आहेत. तसेच अविनाश नारकर यांची ‘कन्यादान’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील २०२१पासून अविनाश यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कन्यादान’ मालिका सुरू आहे. या मालिकेत अविनाश यांच्यासह अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens apologizes to aishwarya and avinash narkar after troll them sva 00